मुंबई-
अमरावती विभाग पदवीधर मतदार संघातून विधानपरिषदेवर निवडून आलेल्या पदवीधर मतदारसंघातून डॉ. रणजित विठ्ठलराव पाटील आणि शिक्षक मतदारसंघातून विक्रम काळे, नागोराव गाणार, बाळाराम पाटील,यांनी आज विधानपरिषद सदस्यत्वाची शपथ घेतली.विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी त्यांना आज विधानपरिषद सभागृहात शपथ दिली.
यावेळी विधानभवनात झालेल्या शपथविधी समारंभास विधानपरिषदेचे सदस्य हेमंत टकले, सुनिल तटकरे, शरद रणपिसे, प्रधान सचिव डॉ. अनंत कळसे, अध्यक्षांचे सहसचिव म.मु.काज, सचिव राजकुमार सागर, उपसचिव विलास आठवले, राजेश तारवी, ऋतुराज कुडतरकर, अवर सचिव उमेश शिंदे, रविंद्र जगदाळे, सुनिल झोरे आदी उपस्थित होते.
Post a Comment