अमरावती /-
राठी नगर येथे प्रहार ची जाहीर सभा संपन्न
अमरावती महानगरपालिकेचा निवडणूक प्रचारार्थ आज राठी नगर येथे अचलपूर चे विद्यमान आमदार श्री बच्चू कडू यांची जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते यावेळी सभेला सुरवात होण्या अगोदर अंध कलाकारांचा
गितसंगीताचा कार्यक्रम चे आयोजन सुद्धा करण्यात आले होते . यावेळी आमदार बच्चू कडू यांनी बोलताना म्हटले कि PDMC प्रभागातील जनता खूप भाग्यवान आहे कारण याच प्रभागात श्री शिवाजीराव पटवर्धन यांच तपोवन , गाड्गेबाबांचं मंदिर येत -गाडगेबाबांचा प्रभागाला बट्टा लागू देऊ नका, यावेळी त्यांनी शिवसेनेवर टीका करत मोहन क्षीरसागर यांचा बद्दल सांगितले कि ज्याने शिवसैनिक म्हणून इतके वर्ष काम केले त्याला जर तिकीट नाकारल्या जात असेल तर त्याचा पाठीशी बच्चू कडू आहे असेही ते म्हणाले - श्री अतुल इंगोले बद्दल बोलताना ते म्हणाले कि अन्नदान , भागवत सप्ता , आदर्श शिक्षकाची रक्ततुला करणारा अतुल इंगोले यांचा विचारांनी प्रहार चालत - अतुल ने कॉंग्रेस च्या पंजा सोडला बर झाल - आता तो सैतानी पंजा झाला आहे अशी टीका हि त्यांनी केली पंज्यानी देशाची वाट लावली आहे. सध्याची परीस्थी अशी आहे कि सर्वच ठिकाणी कार्यकर्त्यांना संधी दिली जात नाही आहे ज्याचा कडे पैसा आहे त्यालाच तिकीट मिळत आहेत- बच्चू कडू ला ३ दा निवडून दिल एखाद्या चांगल्या कार्यकर्त्याला नेत्याची गरज नसते असेही ते म्हणाले. यावेळी त्यांनी मोदी सरकारक च्या निर्णयावर आक्षेप घेतला ४ महिन्या आधी या देशातील तुरीवर निर्यात बंदी आणली - आयात निर्यात चे धोरण बदलवले विदेशातील तूर आयात केली २० लाख टन व त्याचे भाव १८००० रुपये आणि भारतातील तूर ४००० रुपयाने विकल्या जात आहे याबाबत मी आपल्या खासदारांना विचारणा केली असता साहेब आयात निर्यात धोरणावर काही करा - तेव्हा ते म्हणाले कि आमचाच पक्षाने हा निर्णय घेतला . मोदींचे १५ लाख अजून खात्यात आले नाही यावर हि बच्चू कडू यांनी प्रकाश टाकला. काही नगरसेवकांचा घरी जायला भीती वाटते त्यांचे मोठाले घर पाहून असेः ते म्हणाले.
माझा जन्म फक्त जनतेच्या सेवेकरिता झाला आहे - श्री अतुल इंगोले
मी दरवर्षी माझा वयाचा संख्येत झाड लावत असतो, मी एका राष्ट्रीय पक्षाला तिकीट मागितली तेव्हा त्यांनी मला माझा बँकेचे पासबुक मागितले व किती पैसे आहेत अशी विचारणा हि केली पण जेव्हा मी बच्चू कडू यांचाकडे गेलो तेव्हा त्यांनी मला सांगितले कि निवडणूक लढवायला पैसे नाही सामाजिक कार्य महत्वाच आहे.
देशी दारूचं दुकान बंद होणार नाही तो पर्यंत महानगपालिकेचा नगरसेवक म्हणून निवडून आल्यावर मानधन घेणार नाही अस ठाम मत अतुल इंगोले यांनी व्यक्त केले
प्रभाग क्रमांक 2 PDMC मधून अतुल इंगोले,मीनल सवाई,मोहन क्षिरसागर हे प्रहर पक्षाचा निवडणूक चिन्हावर निवडणूक लढवत आहेत.
प्रभाग क्रमांक 2 PDMC मधून अतुल इंगोले,मीनल सवाई,मोहन क्षिरसागर हे प्रहर पक्षाचा निवडणूक चिन्हावर निवडणूक लढवत आहेत.



Post a Comment