रिसोड/रुपेश बाजड/-
वाशिम जिल्ह्यातील रिसोड तालुक्यातील ग्राम हराळ येथे रयतेचे राजे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 387 व्या जयंती निमित्य १५ फेब्रुवारी बुधवारला अँड वैशाली डोळस यांचे जाहीर व्याख्यानाचा कार्यक्रम सायंकाळी ठीक ७ वाजता आयोजित केला आहे.वैशालीताई डोळस नावाचं हे नाव परिवर्तनवादी विचाराचे वादळ होय.हजारो वर्षांपासूनची जोखड तोडून समता, न्याय बंधुता व मानवतेची वैचारिक बैठक निर्माण करण्याचे कार्य व्याख्यानाच्या माध्यमातून ऍड डोळस करीत आहेत तरी रिसोड तालुक्यातील सर्व बहुजन बांधवांनी उपस्थित राहावे असे आवाहन सार्वजनिक शिवजयंती उत्सव समिती हराळ यांच्या वतीने करण्यात येत आहे.

Post a Comment