BREAKING NEWS

Sunday, February 12, 2017

विद्याथ्र्यांनी दिला गावकऱ्याना मतदानांचा हक्क बजावण्याचा संदेश, आमला विश्वेश्वर येथे मतदार जनजागृती रॅली - उपविभागीय अधिकारी वऱ्हाडे सह अनेक अधिकारी झाले रॅलीत सामील


चांदूर रेल्वे / शहेजाद खान /-




अमरावती जिल्हा परिषद सार्वत्रिक निवडणूक येत्या २१ फेब्रुवारीला होणार आहे.या निवडणूकीसह येणाऱ्या  सर्व निवडणूकीत प्रत्येक गावातील गावकऱ्यांनी, मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावावा असा संदेश आमला विश्वेश्वर येथे काढण्यात आलेल्या मतदार जनजागृती रॅलीतून विद्याथ्र्यांनी थोर-मोठ्यांना दिला. या रॅलीत चांदूर रेल्वे उपविभागीय अधिकारी ललीत वऱ्हाडे , तहसीलदार राजगडकर, गटशिक्षणाधिकारी अशोक इंगळे यांच्यासह सर्व अधिकारी, कर्मचारी शिक्षक व विद्यार्थी सामिल झाले होते.


श्रीकृष्ण हायस्कूल  येथून मतदार जनजागृती रॅली ला सुरूवात झाली. ग्रामपंचायत चौक, विश्वेश्वर मंदिर, हनुमान मंदिर मार्ग, इंदिरा गांधी चौक, नेहरू चौक, इंदिरा आवास वसाहत, आठवडी बाजार चौकातुन रॅली फिरून समारोप श्रीकृष्ण हायस्कूल येथे समारोप करण्यात आला. भारतीय संविधानाने सर्व मतदारांना मतदानाचा हक्क दिला आहे. त्यांचा वापर मतदारांनी करावा असा संदेश श्रीकृष्ण हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, इंदिरा गांधी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळच्या सर्व विद्याथ्र्यांनी रॅलीतून हात फलक व बॅनर व ध्वनीक्षेपकावरून घोषणाव्दारे गावकऱ्याना  दिला.



या रॅली नंतर श्रीकृष्ण  हायस्कूल येथे मतदार जनजागृती सभा घेण्यात आली. या सभेच्या अध्यक्षस्थानी चांदूर रेल्वे उपविभागीय अधिकारी ललीत वऱ्हाडे , प्रमुख अतिथी तहसीलदार बी.ए.राजगडकर,गटविकास अधिकारी अमोल अंदेलवाड, गटशिक्षणाधिकारी अशोक इंगळे, नायब तहसीलदार दिनेश बडीये, श्री पळसकर, श्रीकांत विसपुते,विस्तार अधिकारी चव्हाण, मंडळ अधिकारी वाढोणकर, इंदिरा गांधी हायस्कूल च्या  मुख्याध्यापिका अर्चना भटकर, जि.प.प्रा.शाळेचे मुख्याध्यापक दिलीप चौधरी, प्राचार्य सुरेश देवळे, पर्यवेक्षिका भारती अवधतुकर आदींची उपस्थिती होती.यावेळी उपविभागीय अधिकारी ललीत वऱ्हाडे  यांनी मार्गदर्शन केले.


कार्यक्रमाचे संचालन कविता बोराळे, प्रास्ताविक प्राचार्य सुरेश देवळे व आभार नायब तहसीलदार श्रीकांत विसपुते यांनी मानले.या रॅलीत ग्रामविकास अधिकारी देशमुख, तलाठी स्वप्निल देशमुख, तलाठी वंजारी, पत्रकार प्रा.रवींद्र मेंढे, अंगणवाडी सेविका, ग्रा.पं.कर्मचारी आणि विद्यार्थी श्रीकृष्ण हायस्कूल ,इंदिरा गांधी विद्यालय व जि.प.प्राथ.शाळेचे सर्व शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने सामिल झाले होते.

Share this:

Post a Comment

सूचना

विदर्भ24न्यूज़ पोर्टल को बेहतर बनाने में सहायता करें और किसी खबर या अंश मे कोई गलती हो या सूचना / तथ्य में कोई कमी हो तो हमसे संपर्क करे - 9421719953

 
Copyright © 2014 Vidarbha Latest News विदर्भ24न्यूज Amravati Letest News. Template Designed by Vidarbha24news - या इंटरनेट न्यूज चॅनेल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही.