BREAKING NEWS

Tuesday, February 14, 2017

चांदूर रेल्वे तालुक्यात बसपा-भारिप-बमसंची युती - प्रस्थापित भाजप, काँग्रेसला देणार टक्कर


चांदूर रेल्वे / शहेजाद खान -




चांदूर रेल्वे तालुक्यात होणाऱ्या आमला विश्वेश्वर, पळसखेड व घुईखेड जिल्हा परिषद सर्कल  निवडणूकीत बहुजन समाज पार्टी व भारतीय रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया-बहुजन महासंघाच्या तालुका अध्यक्षांनी एकमेकांना समर्थन दिले आहे. या दोन्ही बलाढ्य समविचारी पक्षाची युती तालुक्यातील काँग्रेस, भाजप या राष्ट्रीय पक्षाना हादरे देणारी ठरणार आहे.
बहुजन समाज पार्टीचे धामणगाव विधानसभा अध्यक्ष मनोज वानखडे व भारिप-बमसं चांदूर रेल्वे तालुकाध्यक्ष मुवूâल परगणे यांच्या झालेल्या दोन्ही पक्षाच्या संयुक्त बैठकीत बहुजन समाज पार्टी भारीप-बमसं ला घुईखेड व पळसखेड जि.प.सर्कल मध्ये समर्थन देणार आहे. तर भारतीय रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया-बहुजन महासंघाचे बहुजन समाज पार्टी ला आमला विश्वेश्वर जि.प.सर्कल मध्ये समर्थन देण्याचे सर्वानुमते ठरले आहे. त्यानुसार आमला विश्वेश्वर (अनुसूचित जाती महिला) जि.प.सर्कल  मधून बहुजन समाज पार्टीचे उमेदवार संघमित्रा आनंद भगत यांच्यासाठी भारिप-बमसंच्या संगीता चंदू उके यांनी काल उमेदवारी अर्ज मागे घेतला. तसेच बहुजन समाज पार्टीने तालुक्यातील पळसखेड व घुईखेड जि.प.सर्कल  मध्ये पक्षाचे उमेदवार निवडणूकीला उभे केले नाही. त्यामूळे आता बहुजन समाज पार्टी पळसखेड (अनुसूचित जाती) जि.प.सर्कल  मध्ये भारिप-बमसं चे प्रशांत ओंकार पाटील व घुईखेड (सर्वसाधारण महिला) जि.प.सर्कल मधून भारिप-बमसं चे मनिषा मुकुल  परगणे यांना समर्थन दिले आहे. यामूळे तिन्ही जि.प.सर्कल मध्ये भारिप-बमसं व बहुजन समाज पार्टीचे पारडे जड झाले आहे. एकीकडे रिपाई आठवले गट जिल्ह्यातील रिपाई कार्यकत्र्यांसाठी एकही जागा न घेता भाजपाच्या दावणीला बांधल्याचे दिसते. तर दुसरीकडे रिपाई कवाडे गट एकही जागा न घेता काँग्रेस सोबत मिरवितांना दिसत आहे. यामूळे या दोन्ही पक्षाचे कोणतेच अस्तित्व दिसत नाही.त्या ठिकाणी चांदूर रेल्वे तालुक्यात भारिप-बमसं व बहुजन समाज पार्टी हे दोन समविचारी पक्ष राजकिय व समाज हितासाठी एकत्र बसुन निवडणूक लढतांना दिसत आहे. हे निश्चितच आंबेडकरी नेत्यांच्या डोळ्यात झंनझंनीत अंजन टाकल्या सारखे आहे. या समर्थनातून बहुजन समाजासमोर एक चांगला पर्याय उभा राहीला आहे एवढे मात्र निश्चित!

Share this:

Post a Comment

सूचना

विदर्भ24न्यूज़ पोर्टल को बेहतर बनाने में सहायता करें और किसी खबर या अंश मे कोई गलती हो या सूचना / तथ्य में कोई कमी हो तो हमसे संपर्क करे - 9421719953

 
Copyright © 2014 Vidarbha Latest News विदर्भ24न्यूज Amravati Letest News. Template Designed by Vidarbha24news - या इंटरनेट न्यूज चॅनेल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही.