मुंबई. ( शाहरुख मुलाणी ) –
शेतकऱ्यांना सरसकट कर्जमुक्ती देण्यासाठी राज्यातील सर्व ग्रामपंचायतींनी येणाऱ्या 1 मे या महाराष्ट्र दिनी ग्रामसभेत ठराव करावेत, असे आवाहन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी केले आहे.
खासदार शेट्टी म्हणाले की, राज्यभरासह देशातील शेतकरी कर्जबाजारी होऊन आत्महत्या करू लागला आहे. सरकारी धोरणामुळे त्यांच्या शेतीमालाला भाव नाही. शेतकरी दिवसेंदिवस कर्जबाजारी होत चाललेला आहे. शेतकरी कर्जमुक्ती वरून राज्य आणि केंद्र सरकार चालढकल करत आहे. कर्जमुक्ती वरून स्वाभिमानी शेतकरी संघटना दि. 28 एप्रिल पासून रस्त्यावर उतरत आहे. केंद्र आणि राज्य सरकारला जाग आणण्यासाठी राज्यातील सर्व ग्रामपंचायतींनी 1 मे या महाराष्ट्र दिनी शेतकरी कर्जमुक्तीचा ग्रामसभेत ठराव करावेत. तसेच स्वामिनाथन कमिटीच्या शिफारशी जशाच्या तशा त्वरीत लागू कराव्यात व राज्यातील मायक्रो फायनान्स कंपन्यांवर तातडीने कारवाई करून पिडीतांनी सरकारी नियमा प्रमाणे 6 टक्के व्याज दराने त्वरीत कर्ज उपलब्ध करून द्यावे, असे तीन ठराव राज्यातील सर्व ग्रामपंचायतींनी 1 मे महाराष्ट्र दिनानिमित्त गावागावात घेण्यात येणार्या ग्रामसभेत करावेत, तसेच ठरावाच्या प्रति खासदार राजू शेट्टी जनसंपर्क कार्यालय जयसिंगपूर येथे पाठविण्यात याव्यात. पंतप्रधान, केंद्रीय अर्थ मंत्री, मुख्यमंत्री यांना देखील या ठरावाच्या प्रति पाठवाव्यात असे आवाहन खा. शेट्टी यांनी केले आहे.
Sunday, April 9, 2017
1 मे महाराष्ट्र दिनी राज्यातील ग्रामपंचायतींनी शेतकरी कर्जमुक्तीचे ठराव करावेत – खासदार श्री राजू शेट्टी
Posted by vidarbha on 6:51:00 PM in मुंबई. ( शाहरुख मुलाणी ) – | Comments : 0
Subscribe to:
Post Comments
(
Atom
)

Post a Comment