BREAKING NEWS

Sunday, April 9, 2017

एक महिन्यापासुन नाफेड अधिकाऱ्यांनी तुर मोजुन न घेतल्याने शेतकरी हवालदिल !- शेतकऱ्यांनी एसडीओंना दिले निवेदन


चांदुर रेल्वे -  (शहेजाद खान ) -



एकीकडे दिवस रात्र घाम गाळुन शेतकरी शेतातला माल पिकवुन घरी आणतो. परंतु अगोदरच जर्जर झालेला शेतकरी, अशात त्याच्या शेतमालाला बाजार समितीमध्ये भाव नाही. तर दुसरीकडे शासन शेतकऱ्यांचा माल हमी भावाने खरेदी करणार यामुळे शेतकऱ्यांनी बाजार समितीमध्ये आनुन ठेवलेली तुर नाफेड अधिकाऱ्यांनी गेल्या एक महिन्यापासुन मोजमाप न केल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.
     शेतकऱ्यांच्या सोयाबीन , मुंग, हरभरा, तुर आदीं शेतमालाला कवडीमोल भाव बाजारात मिळत आहे. यामुळे शासनाने नाफेड मार्फत शेतकऱ्यांची तुर ५०५० रूपये प्रतिक्विंटल या भावाने खरेदी करण्याचा निर्णय घेतला. व शेतकऱ्यांच्या जवळचा तुरीचा दाना असेपर्यंत हा माल मोजणार असल्याचे जाहीर केले. परंतु तालुक्यातील शेतकऱ्यांची तुर स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समितीत एक महिन्यापासुन बेवारस पडुन असुनही त्या तुरीचे मोजमाप करून घेण्यास नाफेड अधिकारी टाळाटाळ करीत आहे. या अगोदर मात्र व्यापाऱ्यांनी अतिशय कमी दराने शेतकऱ्यांची तुर खरेदी करून तीच तुर ५ हजार ५० रूपये भावाने नाफेडला देऊन लाखो रूपयांचा मलीदा लाटला. परंतु शेतकऱ्यांनी तीच तुर नाफेड अधिकारी घेत नव्हते हे विशेष.
     तरी शासनाने जाहीर केल्याप्रमाणे शेतकऱ्यांचा शेवटचा तुरीचा दाना असेपर्यंत खरेदी करणार असे सांगितल्यामुळे खरेदी त्वरीत सुरू करावी व शेतकऱ्यांना न्याय द्यावा अशी मागणी महाराष्ट्र राज्य वारकरी महामंडळाचे तालुका अध्यक्ष रविंद्र किसनरान काळमेघ, रविंद्र मेश्राम, अ. राजीकभाई, शे. सुभान शे. उस्मान, रामदास वरघट, पडोळे, थेटे यांसह शेकडो शेतकऱ्यांनी केली.



लढवय्या माणसाचीही नाही घेतली दखल-
माजी आमदार स्व. डॉ. पांडुरंग ढोलें

माजी आमदार स्व. डॉ. पांडुरंग ढोलेंनी आपली तुर कित्येक दिवस बाजार समितीत ठेवली होती व मृत्युच्या दोन दिवसापहिले म्हणजेच दि. ३ एप्रीलला आपली तुर त्रस्त होऊन घरी परत आणुन ठेवली. व त्याच दिवशी उपविभागीय अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांविषयी तक्रारसुध्दा दिली. सायंकाळी मुंबईला रवाना झाले. व तिसऱ्या दिवशी मुंबईवरून परत आल्यानंतर शेतात जात असतांना ५ एप्रीलला त्यांचा अपघातात मृत्यु झाला. म्हणजे अशा लढवय्या माणसाची सुध्दा दखल घेतल्या गेली नाही.

Share this:

Post a Comment

सूचना

विदर्भ24न्यूज़ पोर्टल को बेहतर बनाने में सहायता करें और किसी खबर या अंश मे कोई गलती हो या सूचना / तथ्य में कोई कमी हो तो हमसे संपर्क करे - 9421719953

 
Copyright © 2014 Vidarbha Latest News विदर्भ24न्यूज Amravati Letest News. Template Designed by Vidarbha24news - या इंटरनेट न्यूज चॅनेल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही.