BREAKING NEWS

Sunday, April 9, 2017

शहरात भगवान महावीर जयंती उत्साहात साजरी - शोभायात्रेने वेधले चांदुरकरांचे लक्ष



चांदुर रेल्वे : - (शहेजाद खान ) -


अहिंसेचे पुजारी, पंचशील गुणांची शिकवण देणारे जैन धर्माचे चोवीसावे तीर्थंकर भगवान महावीर यांची २६१६ वी जयंती चांदुर रेल्वे शहरात विविध धार्मिक कार्यक्रम व सामाजिक उपक्रमांनी उत्साहात साजरी करण्यात आली़. यावेळी काढण्यात आलेल्या शोभायात्रेने चांदुरकरांचे लक्ष वेधले़.


       सकल जैन समाजाच्या वतीने दिगंबर, श्वेतांबर जैन बांधव एकत्र येऊन दरवर्षी भगवान महावीरांची जयंती भक्तीभावाने व उत्साहात साजरी करतात. रविवारी सकल जैन समाजाच्या वतीने भगवान महावीरांची पालखीसह शोभायात्रा काढण्यात आली़. शोभायात्रेत बॅन्ड पथकाचा सहभाग होता़. जैन स्त्री-पुरूष, अबाल-वृध्द पारंपरिक वेशात सहभागी झाले होते़. ह्या शोभायात्रेला सुरूवात होताच स्व. गणपतलालजी जैन यांच्या स्मृती प्रित्यर्थ गांधी चौकातील जैन स्थानकात शोभायात्रेत शामिल सर्व बांधवांना फळ वाटप करण्यात आले. ही शोभायात्रा जैन मंदिरातुन निघुन सिनेमा चौक, धनराज नगर, जुना बस स्टैंड, जैन स्थानक या ठिकानांहुन फिरून पुन्हा जैन मंदिराजवळ येऊन विसर्जित झाली. ही शोभायात्रा कुऱ्हा रोडने जात असतांना जैन मोटर्स जवळ नगराध्यक्ष शिट्टु उर्फ निलेश सुर्यवंशी व भाजपा कार्यकर्त्यांच्या वतीने शरबत वाटप करण्यात आले. तसेच शोभायात्रा जुना मोटार स्टैंडवर येताच माजी नगराध्यक्ष छोटुभाऊ विश्वकर्मा यांच्यावतीने भगवान महाविरांच्या रथावर फुलांचा वर्षाव करण्यात आला.

   या शोभायात्रेत मधुसुदन जैन, सुदर्शन जैन, प्रदिप जैन, प्रमोद नागमोते, गाडेकर, कमल गुगलीया, सुमेरचंद जैन, बबनराव बेराड, देविदास बेराड, राजेश जैन, जयप्रकाश चोरडीया, राहुल जैन, दिलीप गोलेच्छा, पप्पु कोटेचा, भिकमचंद तोडरवाल, पवन खाबीया, निर्मल गुगलीया, अक्षय जैन, धरमचंद जैन, शांतीलाल बागमार, रमेश सिंघवी, जयेश नगरीया, किर्ती कोठारी, अभिषेक जैन, डॉबी जैन, हर्षद गुगलीया आदी सहभागी झाले होते. शोभायात्रेत सहभागी झालेले भगवान महावीरांचा जयघोष करीत होते. शोभायात्रेनंतर महाप्रसादाचेही आयोजन करण्यात आले होते.

Share this:

Post a Comment

सूचना

विदर्भ24न्यूज़ पोर्टल को बेहतर बनाने में सहायता करें और किसी खबर या अंश मे कोई गलती हो या सूचना / तथ्य में कोई कमी हो तो हमसे संपर्क करे - 9421719953

 
Copyright © 2014 Vidarbha Latest News विदर्भ24न्यूज Amravati Letest News. Template Designed by Vidarbha24news - या इंटरनेट न्यूज चॅनेल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही.