BREAKING NEWS

Sunday, April 9, 2017

सेनगांव येथील गर्भापाताच्या साठा संबधी तपासावरच प्रश्न चिन्ह

 महेन्द्र महाजन जैन / रिसोड -



सेनगाव:- सेनगाव तालुक्यातील येथील जय गजानन मेडीकलवर औरंगाबाद येथील अन्न व औषधी भेसळ प्रतिबंधक विभागाच्या सहायक आयुक्तांच्या पथकाने छापा मारुन आरोपी सहीत लाखो रुपयाचा गर्भपाताचा औषध साठा जप्त केल्याने सेनगांव तालुक्यात एकच खळबळ उडाली होती.
याप्रकरणी आयुक्त हर्षदीप कांबळे यांच्याकडे केलेल्या तक्रारीनुसार सहायक आयुक्त अमृत निखाडे याच्या पथकाने सामाजिक कार्यकर्ते संजय देशमुख अकोला  यांनी दिलेल्या माहीती नुसार या पथकाने आरोपीच्या घराची व दुकानाची झडती घेतली असता या पथकाच्या हाती शासनाने बंदी घातली असलेला गर्भनिरोधक गोळ्यांचा व ईतर ओषधी साठा सापडल्याने याप्रकरणी सेनगांव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलीस स्टेशनमध्ये मुद्देमालासह आरोपी ही पकडण्यात आला असतांना पोलीस ठाण्यात घेतलेल्या फोटोत पोलीसा समक्ष मुद्देमाला सोबत आरोपी ही दिसत असतांना आता तपास करतांना तपास अधिकारी मोरे यांना विचारणा केली असता आरोपी फरार आहे असे सांगण्यात येत आहे. रामुळे तपास अधिकार्याच्या तपासाकडे प्रश्न चिन्ह निर्माण झाले आहे. आरोपीला फरार होण्याची सुट दिल्याने या तपासाकडेच अनेकांचे प्रश्न निर्माण होत आहेत आरोपीच फरार असल्याने याप्रकरणी काय तपास लागणार याविषयी सेनगांव तालुक्यात उलट-सुलट चर्चेला उधान आले आहे. महाराष्ट्रात सर्वात मोठी घटना सेनगांव येथे घडुन ही याविषयी सेनगांव तपास अधिकारी यांनाच या गुन्ह्याचा अभ्याष नसल्याने याप्रकरणा विषयी सेनगांव तपास अधिकार्यांची निष्क्रीय भुमिका दिसुन येत आहे. याप्रकरणी सेनगांव तालुक्यासह मराठवाडा, विदर्भात मोठे रँकेट उघडकीस येईल अशी चर्चा सेनगांव परीसरात जोमाने होत असताना याविषयी तपासच थंड बस्त्यात अडकल्याने व मुख्य आरोपीच फरार असल्याने याप्रकरणी काय कारवाई होते याकडे संपुर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागुन आहे. याप्रकरणी गर्भपाताच्या ९३ किट गायब असल्याने या किटचा तपास लावणे ही तेवढेच गरजेचे झाले आहे.

Share this:

Post a Comment

सूचना

विदर्भ24न्यूज़ पोर्टल को बेहतर बनाने में सहायता करें और किसी खबर या अंश मे कोई गलती हो या सूचना / तथ्य में कोई कमी हो तो हमसे संपर्क करे - 9421719953

 
Copyright © 2014 Vidarbha Latest News विदर्भ24न्यूज Amravati Letest News. Template Designed by Vidarbha24news - या इंटरनेट न्यूज चॅनेल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही.