पुणे -
पुणे महापालिकेच्या महापौर निवडणुकीचा कार्यक्रम विभागीय आयुक्त कार्यालयाकडून जाहीर करण्यात आला आहे. महापौरपदासाठी येत्या १५ मार्च रोजी निवडणूक होणार आहे. महापौरपदाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यामुळे भारतीय जनता पक्षात मोर्चेबांधणीला वेग आला आहे. येत्या दोन-तीन दिवसांमध्ये महापौर पदाच्या उमेदवाराचे नाव भारतीय जनता पक्षाकडून निश्चित केले जाणार असून ज्येष्ठ नगरसेविका मुक्ता टिळक यांनाच संधी दिली जाईल, अशी शक्यता पक्षात वर्तविण्यात येत आहे.‘‘विभागीय आयुक्तांनी जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार येत्या १५ मार्च रोजी (बुधवारी) सकाळी साडेअकरा वाजता महापालिकेच्या श्री छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात ही निवडणूक होणार आहे. जिल्हाधिकारी सौरव राव हे पीठासन अधिकारी म्हणून काम पाहणार आहेत. या निवडणुकीसाठी नामनिर्देशन पत्र दाखल करण्याचा दिनांक शुक्रवारी (३ मार्च) जाहीर करण्यात येईल,’’ अशी माहिती महापालिकेचे नगरसचिव सुनील पारखी यांनी दिली.
पुणे –
गेली १४ वर्षे हिंदु जनजागृती समिती, सनातन
संस्था आणि अन्य समविचारी संस्था यांच्या वतीने ‘खडकवासला जलाशय रक्षण
अभियान’ राबवण्यात येते. संपूर्ण पुणे शहराला पाणीपुरवठा करणार्या
खडकवासला जलाशयामधील जलस्त्रोत प्रदूषित होऊ नये; म्हणून या अभियानाच्या
अंतर्गत धरणाच्या भोवती मानवी साखळी करून पाण्यात उतरू पहाणार्या
नागरिकांचे प्रबोधन केले जायचे. या उपक्रमाची आता प्रशासकीय स्तरावर नोंद
घेतली गेली असून जिल्हाधिकारी श्री. सौरभ राव यांनी होळी आणि रंगपंचमी या
दिवशी रंग खेळून धरणात उतरण्यास नागरिकांना प्रतिबंध केला आहे. श्री. राव
यांनी पत्रकार परिषदेत तशी माहिती दिली. पोलीस, महापालिकेचे कर्मचारी,
स्वयंसेवी संस्थांचे कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिक खडकवासला धरणाभोवती
मानवी साखळी करून थांबणार असल्याचे त्यांनी सांगितले.
गेल्याच आठवड्यात सनातन संस्थेचे श्री. प्रवीण नाईक, हिंदु जनजागृती
समितीचे सर्वश्री दीपक आगवणे, महेश पाठक, कृष्णाजी पाटील यांनी
जिल्हाधिकार्यांची भेट घेऊन त्यांना समितीच्या उपक्रमाची सविस्तर माहिती
सांगून यामध्ये प्रशासनाचा सहभाग वाढावा, यासाठी निवेदन दिले होते, तसेच या
अभियानाचे संगणकीय सादरीकरण (पॉवरपॉईंट प्रेझेंटेशन) केले होते. त्या वेळी
श्री. राव यांनी या उपक्रमाचे कौतुक करून ‘प्रशासनाचेही या उपक्रमाला
सहकार्य लाभेल’, असे आश्वासन दिले. त्यांनी तातडीने या उपक्रमाच्या
प्रसिद्धीचे, तसेच शासकीय कर्मचार्यांनी पर्यावरण रक्षणाच्या उपक्रमात
सहभागी सहभागी होण्याचे आदेश दिले. धर्माभिमानी सर्वश्री हणमंत आंबावडेकर,
सुधाकर संगनवार, सुरेंद्र कुमार हेही जिल्हाधिकार्यांना निवेदन देतांना
उपस्थित होते.
‘प्रशासनाने या उपक्रमाची नोंद घेऊन जलप्रदूषण रोखण्याच्या दृष्टीने
दिलेला आदेश आणि या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी घेतलेला पुढाकार कौतुकास्पद
आहे’, अशी प्रतिक्रिया हिंदु जनजागृती समितीचे श्री. अभिजीत देशमुख यांनी
व्यक्त केली.
पुणे–
रासायनिक रंग लावून
खडकवासला धरणात खेळण्यासाठी येणार्या नागरिकांपासून जलाशयाचे रक्षण व्हावे
अर्थात् जलप्रदूषणाला आळा बसावा, या उद्देशाने गेली सलग १४ वर्षे हिंदु
जनजागृती समिती अन्य समविचारी संघटनांच्या समवेत ‘खडकवासला जलाशय रक्षण
अभियान’ राबवत आहे. यावर्षीही १३ मार्च (धूलिवंदन) आणि १७ मार्च (रंगपंचमी)
या दोन दिवशी खडकवासला धरणाच्या भोवती मानवी साखळी करून नागरिकांचे
प्रबोधन केले जाणार आहे. ‘कमिन्स इंडिया लिमिटेड’ या आस्थापनाचे कर्मचारी,
अधिकारी, तसेच स्थानिक ग्रामस्थही या अभियानात सहभागी होणार आहेत. अधिकाधिक
जणांनी पर्यावरण रक्षणाच्या उपक्रमात सहभागी व्हावे. त्यासाठी ८९८३३३५५१७
या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन सनातन संस्थेचे श्री. प्रवीण नाईक
यांनी पत्रकार परिषदेत केले. या वेळी हिंदु जनजागृती समितीचे श्री. चैतन्य
तागडे, ‘गार्गी सेवा फाऊंडेशन’चे संस्थापक अध्यक्ष श्री. विजय गावडे,
गोर्हे बुद्रुकचे सरपंच श्री. सचिन पासलकर हेही उपस्थित होते.
प्रशासनाच्या वतीनेही यंदाच्या वर्षी धूलिवंदन आणि रंगपंचमी या दिवशी
खडकवासला धरणात उतरण्यास नागरिकांना प्रतिबंध केला आहे. समिती, तसेच संस्था
यांच्या सातत्यपूर्ण उपक्रमामुळे प्रशासनाने याची नोंद घेऊन पर्यावरण
रक्षणासाठी पुढाकार घेतल्याविषयी श्री. नाईक यांनी समाधान व्यक्त केले.
श्री. तागडे यांनी उपक्रमाविषयी सविस्तर माहिती दिली.
पुणे–
आजची काश्मीरसमस्या ही राजकीय नसून ही दोन धर्मांची लढाई आहे. गेल्या १ सहस्र वर्षांपासून धर्मांधांकडून हिंदूंवर प्रहार होत आहेत. गेल्या ७० वर्षांत हिंदूंना हिंदूंच्याच देशातून विस्थापित व्हावे लागत आहे. आज धर्मांध हे आमच्याच छाताडावर उभे राहून उघडउघड विरोध करत आहेत. त्यामुळे आपल्याला आपला काश्मीर मिळवण्यासाठी तेथून धर्मांधांना हाकलून लावून तेथे भगवा फडकवायचा आहे, असे परखड प्रतिपादन काश्मीर हिंदु सभेचे माजी अध्यक्ष श्री. रमेश शिवपुरी यांनी केले. ‘पनून कश्मीर’च्या वतीने १९ जानेवारी या दिवशी ‘काश्मिरी हिंदू विस्थापितदिना’च्या निमित्ताने धानोरी (जिल्हा पुणे) येथील काश्मीर भवनात आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. या वेळी काश्मीर हिंदु सभेचे अध्यक्ष श्री. जगमोहन कौल, ज्येष्ठ साहित्यिक डॉ. अमर मालमोही, काश्मीर वाहिनीच्या रितु सुंभली, हिंदु जनजागृती समितीचे श्री. पराग गोखले आणि समितीप्रणित रणरागिणी शाखेच्या सौ. राजश्री तिवारी, तसेच अनेक काश्मिरी हिंदू उपस्थित होते.
श्री. रमेश शिवपुरी पुढे म्हणाले,
१. धर्मांधांनी हिंदूंना कमकुवत समजू नये. धर्मांधांशी हिंदू गेली १ सहस्र वर्षे लढूनही आज भारतात ८३ टक्के हिंदू आहेत. ही लढाई चालू रहाणार आहे.
२. आपल्यातील काही देशद्रोही ‘जयचंद’ हे आपल्याच देशाचे खाऊन आपल्याच देशाच्या विरोधात काही पैशांसाठी विकले गेले आहेत. अशा ‘आधुनिक जयचंद’ यांना देशातून हाकलले पाहिजे.
३. म. गांधी यांनी हिंदूंची जेवढी हानी केली, तेवढा अन्याय आणि हानी कोणी केली नाही. काश्मीरची समस्या निर्माण होण्यास जवाहरलाल नेहरू हे उत्तरदायी आहेत. सरदार वल्लभभाई पटेल हे पंतप्रधान असते, तर काश्मीरची समस्या राहिलीच नसती.
४. हिंदुस्थान हा देश हिंदूंचा होता, आता आहे आणि पुढेही रहाणारच !
पुणे–
डॉ. दाभोलकर हत्या प्रकरणाची पुढील सुनावणी ३१ जानेवारी या दिवशी होणार आहे. डॉ. दाभोलकर हत्या प्रकरणातील खटल्यात आरोप निश्चिती करण्याच्या जिल्हा न्यायालयाच्या १६ नोव्हेंबर २०१६ च्या आदेशावर स्थगिती आणण्यासाठी केंद्रीय अन्वेषण यंत्रणेने (सीबीआयने) मुंबई उच्च न्यायालयात ८ डिसेंबर २०१६ या दिवशी अर्ज सादर केला होता. त्या अर्जावर उच्च न्यायालयाने लवकर सुनावणी घ्यावी, अशी विनंती ‘सीबीआय’ने केली होती. त्यावर उच्च न्यायालयाने ‘या अर्जावरील सुनावणी जानेवारी मासाच्या तिसर्या आठवड्यात होईल’, असे जिल्हा न्यायालयाला सांगण्याचे तोंडी आदेश दिले होते. त्यामुळे १७ जानेवारी या दिवशी होणारी सुनावणी पुढे ढकलावी, असा अर्ज ‘सीबीआय’ने जिल्हा सत्र न्यायालयामध्ये सादर केला. ‘सीबीआय’च्या या अर्जावर सनातनचे साधक डॉ. वीरेंद्रसिंह तावडे यांच्या अधिवक्त्या नीता धावडे यांनी उत्तर दिले की, ‘उच्च न्यायालयाने सत्र न्यायालयाच्या खटल्यावर स्थगिती दिलेली नाही. त्यामुळे खटला चालवण्यात यावा.’ त्यावर जिल्हा सत्र न्यायाधीश पी.वाय. लाडेकर यांनी या प्रकरणाची पुढील सुनावणी ३१ जानेवारी या दिवशी ठेवली असल्याचे सांगितले.
पुणे –
भारतीय संस्कृतीमध्ये वेदाध्ययनाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. वेद नवीन पिढीला समजावणे आणि आपली संस्कृती अबाधित राखणे, याचे कार्य वेदपाठशाळा करतात. भारतभरामध्ये अनुमाने ३०० वेदपाठशाळा असून त्या सर्वांना मिळून शासन वर्षाकाठी ८ कोटी रुपये अनुदान देते. एकूणच वेदपाठशाळांना शासनाकडून मदरशांइतके अनुदान मिळत नसल्याची खंत येथील वेदभवनचे प्रधान आचार्य वेदाचार्य मोरेश्वर घैसासगुरुजी यांनी व्यक्त केली.
वेदाचार्य घैसासगुरुजी पुढे म्हणाले, ‘‘एकीकडे ही परिस्थिती असतांना वेदपाठशाळेतून पदवी घेऊन बाहेर पडलेल्या मुलांना शुद्ध मंत्र उच्चारता येत नाही. यासाठी वैदिकांची नियुक्ती होणे आवश्यक आहे. तसेच जे कोणी १५ वर्षे अभ्यास करून त्या विषयांत पारंगत होतात, त्यांना अध्यापनाची संधी न मिळाल्याने त्यांना समाजात पौरोहित्य करण्यावाचून पर्याय रहात नाही. त्यामुळे आज वेदज्ञान पौरोहित्यात अडकून पडले आहे. वेदशास्त्राचे एखादे विद्यापीठ असावे, यासाठी माझ्या वडिलांनी सातत्याने शासनाशी पत्रव्यवहार केला; पण त्याचा फारसा उपयोग न झाल्याने आम्ही प्रयत्न सोडून दिले.’’
पुणे –

सनबर्न फेस्टिव्हल ज्या केसनंद गावामध्ये होत आहे, ते ठिकाण धर्मवीर संभाजी महाराज यांचे समाधीस्थान, वारकर्यांचे तीर्थक्षेत्र आळंदी, तसेच अष्टविनायकांपैकी थेऊरच्या श्रीगणेशाचे तीर्थक्षेत्र आदी पवित्र क्षेत्रांनी वेढलेले आहे. या क्षेत्राच्या पावित्र्याची भावना लक्षात घेऊन केसनंद ग्रामस्थांनी १५ ऑगस्ट २००७ मध्ये ग्रामसभेत दारूबंदीचा प्रस्ताव पारित केला. त्याच गावात मद्य, तसेच अमली पदार्थ यांच्या मुक्त सेवनाचा पूर्वेतिहास असणार्या सनबर्न फेस्टिव्हलचे सरकार समर्थन करत आहे. अशा प्रकारे गावातील दारूबंदीचा ठराव मोडू देऊन त्या परिसराचे पावित्र्य भंग करण्याचा सरकारला काय अधिकार आहे ? असा प्रश्न उपस्थित करत हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ता श्री. रमेश शिंदे यांनी सरकारच्या दुटप्पी भूमिकेचा निषेध केला. २८ डिसेंबर या दिवशी येथील पत्रकार भवनात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या प्रसंगी श्री. निखिल मेदनकर, अधिवक्ता नीलेश निढाळकर, सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ता श्री. अभय वर्तक, अधिवक्ता मोहनराव डोंगरे, हवेली तालुका डीजे चालक-मालक संघटनेचे अध्यक्ष श्री. गणेश काळभोर आणि सौ. शुभांगी आफळे हे उपस्थित होते.
संस्कृतीविरोधी आणि कायदे-नियम पायदळी तुडवणार्या सनबर्न फेस्टिव्हलला वैध मार्गाने विरोध करणार्यांवरच कारवाईचा दंडुका उगारण्याच्या पोलीस प्रशासन आणि सरकार यांच्या भूमिकेच्या संदर्भात श्री. रमेश शिंदे यांनी उपस्थित केलेली सूत्रे…
१. कार्यक्रमाच्या आयोजकांकडे काही अनुमत्या मिळणे प्रलंबित असतांनाही सरकारही हा कार्यक्रम पार पाडण्याच्या भूमिकेत आहे. हे म्हणजे कार्यक्रमाला अनधिकृत अनुमती देण्यासारखे आहे.
२. त्या ठिकाणी २५ वर्षांखालील विद्यार्थ्यांना प्रवेश मिळू शकतो, असे म्हटले आहे; मात्र विद्यार्थ्यांची किमान वयोमर्यादा नमूद करण्यात आलेली नाही. या संदर्भात पेटीएम्द्वारे तिकिटे खरेदी करणार्या अनेक जणांनी त्यांना पैसे देऊनही तिकिटे न मिळाल्याने सनबर्न म्हणजे चोरांची टोळी आहे, अशा प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.
३. सरकार एकीकडे व्यसनाधीनता दूर करण्याचे सांगते, तर दुसरीकडे व्यसनाधीनतेला प्रोत्साहन देणार्या कार्यक्रमांना समर्थन देत आहे.
४. कार्यक्रमाच्या ठिकाणी स्थानिक ग्रामस्थ, तसेच पत्रकार यांवर दमदाटी करणार्या बाऊन्सर्सच्या विरोधात कारवाई केली जात नाही; मात्र वैध मार्गाने विरोध करणार्या ग्रामस्थांना कलम १४९ च्या नोटिसा दिल्या जात आहेत. कायदा मोडणार्यांना मोकळीक; मात्र कायदा पाळणार्यांवर कारवाई असेच चित्र आहे. सरकारला महाराष्ट्राला नेमके कुठे नेऊन ठेवायचे आहे ?
 |
| सनबर्नविरोधी बैठकीत उपस्थित शिवसैनिक |
पुणे- धर्म आणि संस्कृती यांच्या रक्षणासाठी शिवसेना नेहमी कटिबद्ध आहे. सनबर्न फेस्टिव्हल भारतीय युवकांना व्यसनाधीन बनवणारा आहे. हा फेस्टिव्हल आम्ही कदापि होऊ देणार नाही. हा फेस्टिव्हल होत असेल, तर शिवसेना पद्धतीने हा कार्यक्रम बंद पाडू, अशी खणखणीत चेतावणी शिवसैनिकांनी दिली आहे. सनबर्न फेस्टिव्हलच्या विरोधात २० डिसेंबर या दिवशी लोणीकंद येथील शिवसेनेच्या कार्यालयात शिवसेना कार्यकारिणीच्या पदाधिकार्यांची जिल्हास्तरीय बैठक पार पडली. त्या वेळी हा निर्धार व्यक्त करण्यात आला. हा फेस्टिव्हल महाराष्ट्रातच नाही, तर भारतात अन्यत्र कुठेही होऊ देणार नाही, अशी चेतावणी शिवसेनेचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष श्री. संदीप अप्पा भोंडवे यांनी दिली. या प्रसंगी ७३ शिवसैनिक, तसेच हिंदु जनजागृती समितीचे श्री. दीपक आगवणे, श्री. पराग गोखले उपस्थित होते. जिल्हाधिकार्यांनी सनबर्न फेस्टिव्हलच्या आयोजकांसमवेत स्थानिक ग्रामस्थ, तसेच हिंदुत्वनिष्ठ यांची २५ डिसेंबर या दिवशी खुली चर्चा आयोजित करावी. कार्यक्रमाच्या अनुमतीपत्राविषयी याप्रसंगी चर्चा ठेवावी अन्यथा २६ डिसेंबर या दिवशी शिवसेना त्यांच्या पद्धतीने उत्तर देईल, असे श्री. संदीप अप्पा भोंडवे यांनी सांगितले.
http://sunburn.in/
#sunburnfestival