BREAKING NEWS
Showing posts with label मुंबई -. Show all posts
Showing posts with label मुंबई -. Show all posts

Monday, May 8, 2017

अगोदर सरकारमधून बाहेर पडा; मग शिवसंपर्क मोहीम राबवा."- खा. अशोकराव चव्हाण

मुंबई -

राज्यातल्या शेतक-यांची काळजी असेल तर शिवसेनेने अगोदर सरकारमधून बाहेर पडावे आणि नंतर शिवसंपर्क अभियान सुरु करावे असे आवाहन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी केले आहे.
टिळक भवन येथे पत्रकारांशी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी शिवसंपर्क अभियान सुरु करण्याच्या शिवसेनेच्या घोषणेवर जोरदार टीका केली. ते म्हणाले की, शिवसेना आणि स्वाभिमानी शेतकरी संघटना हे दोन्ही पक्ष सत्तेत सहभागी आहेत. त्यांनी शेतक-यांचे प्रश्न सोडवावेत. ते सोडवणे त्यांना जमत नसेल तर त्यांनी अगोदर सरकारमधून बाहेर पडावे आणि मग आंदोलने करावीत. विरोधी पक्षांच्या संयुक्त संघर्ष यात्रेला मिळालेला प्रचंड प्रतिसाद पाहून सत्ताधारी पक्षांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. कर्जमाफी देण्यासाठी सरकार कडून केली जाणारी टाळाटाळ आणि तूर खरेदीबाबत फसलेले व्यवस्थापन यामुळे राज्यातील शेतक-यांमध्ये सरकारविरोधात तीव्र असंतोष आहे. शेतक-यांच्या नाराजीचा फटका आपल्याला बसू नये म्हणून उध्दव ठाकरेंनी शिवसंपर्क अभियानाची घोषणा केली आहे. शेतक-यांच्या दुरावस्थेला भाजप इतकीच शिवसेनाही जबाबदार आहे. सत्तेत आल्यावर सातबारा कोरा करू, असे आश्वासन उध्दव ठाकरे यांनी शेतक-यांना दिले होते. शिवसेना सत्तेत होऊन अडीच वर्ष झाली, तरीही राज्यातल्या शेतक-यांचा सातबारा कोरा का केला नाही ?याचे उत्तर उध्दव ठाकरेंनी द्यावे असे खा. चव्हाण म्हणाले.
राज्यात तूर उत्पादक शेतक-यांची परिस्थिती अत्यंत गंभीर आहे. तूर खरेदी केंद्र बंद आहेत. तूर खरेदी केंद्राबाहेर शेतक-यांच्या रांगा लागल्या आहेत. अनेक शेतक-यांची तूर अवकाळी पावसाने भिजली आहे. सरकारच्या नियोजनशून्य कारभारामुळे शेतक-यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. अशा परिस्थितीत शेतक-याला वा-यावर सोडून राज्याचे कृषीमंत्री पांडूरंग फुंडकर आणि अन्न नागरी पुरवठा मंत्री गिरीष बापट परदेश दौ-यावर गेले आहेत. तर कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत सरकार विरोधात मोर्चे काढत आहेत. सरकार विरोधात मंत्री आंदोलन करतायेत अशी दुर्देवी परिस्थिती या राज्याच्या इतिहासात कधी आली नव्हती. शिवसेना आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेला शेतक-यांची एवढीच काळजी असेल तर या पक्षाच्या मंत्र्यांनी अगोदर मंत्री पदाचे राजीनामे द्यावेत आणि मग संपर्क अभियान राबवावे आणि सरकारविरोधात आंदोलने करावीत आम्ही त्यांचे स्वागत करू असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले.

Friday, February 3, 2017

रेल्वेत रात्रीची तिकीट तपासणी आता बंद - जपासून नियमांची अंमलबजावणी

मुंबई - 
रात्रीच्यावेळी रेल्वेतून  प्रवास करत असताना झोपलेल्या तुम्हाला अनेकदा तिकीट विचारण्यासाठी टीसी वारंवार उठवतात. मात्र ही तक्रार लक्षात घेऊन रेल्वेने एक पत्रक काढले आहे. या पत्रकानुसार रात्री १० ते पहाटे ६ वेळात टीसी तुम्हाला वारंवार उठवणार नाही, कोणत्या टीसीने तुम्हाला वारंवार उठवल्यास तुम्हाला तक्रार करता येईल.
लांबपल्ल्याच्या गाड्यांमधून प्रवास करताना तिकीट तपासून झाल्यानंतर देखील अनेकदा टीसी तुमच्याकडे वारंवार तिकीट मागून तुमची झोपमोड करायचे. एकदा तिकीट तपासून झालेले असताना वारंवार तिकीट तपासणे चुकीचे आहे. टीसी बदलल्यानंतर पुन्हा तपासणी व्हायची अशा तक्रारी रेल्वेमत्र्यांकडे वारंवार करण्यात येत होत्या. खरेतर २०१० मध्ये तसे आदेश काढण्यात आले होते. मात्र त्याची अंमलबजावणी होत नव्हती. रेल्वेने २७ जानेवारी रोजीच आदेश मंजूर घेतले आहेत. ३ फेब्रुवारीपासून याची अंमलबजावणी सुरू होईल, कारण तसे हे आदेश रेल्वेच्या सर्व विभागाला देण्यात आले आहेत आणि तसे करण्यासाठी सक्ती करण्यात आली आहे.

Monday, January 23, 2017

(म्हणे) ‘संविधान न मानणार्‍या सनातन संस्थेच्या विरोधात आमची लढाई आहे !’

अंनिसच्या चर्चासत्राचा फज्जा : केवळ ४० लोकांची उपस्थिती !

sanatan-virodh1
मुंबई– सनातन संस्था संविधानाने दिलेल्या अधिकारांनुसार आमच्यावर आरोप करते; मात्र त्यांना संविधान मान्य नाही. खुनशी आणि विद्वेषी भावनेतून धर्म सुधारण्याचे कार्य करणारी सनातन संस्था सामान्य माणसाच्या जिवावर उठली आहे.
 (धादांत खोटे आरोप करून सनातन संस्थेची नाहक अपकीर्ती करणारे अंनिसचे अविनाश पाटील ! सनातनला संविधान मान्य नाही, हे दाखवणारे एकतरी उदाहरण अविनाश पाटील यांच्याकडे आहे का ? उलट तथाकथित अंधश्रद्धा निर्मूलनाच्या नावाखाली हिंदूंच्या श्रद्धांचे भंजन करण्यासाठी विखारी कायदा करू पहाणार्‍यांना वैध मार्गाने रोखून सर्वसामान्यांच्या श्रद्धेची जपणूक करण्याचेच कार्य सनातन संस्थेने केले आहे. धादांत खोटा आरोप करून अंनिसवालेच संविधानातील विचारस्वातंत्र्याचा गैरवापर करत आहेत. त्यामुळे अंनिसवाल्यांवर कायदेशीर कारवाई होण्यासाठी सनातन अधिवक्त्यांचा सल्ला घेत आहे ! – संपादक)
डॉ. दाभोलकर, कॉ. पानसरे आणि प्रा. कलबुर्गी यांच्या हत्येच्या अन्वेषणात होत असलेल्या दिरंगाईच्या निषेधार्थ अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने २० जानेवारी ते २० फेब्रुवारी या कालावधीत निदर्शने करण्यात येत आहेत. या पार्श्‍वभूमीवर ‘दाभोलकर, पानसरे, कलबुर्गी यांच्या खून खटल्यातील प्रचंड विलंब : चिंतन, आकलन, विचारमंथन आणि धोरणनिश्‍चिती’, या विषयावर चर्चा करण्यासाठी १९ जानेवारीला मुंबई मराठा पत्रकार संघात अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने एक चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते. त्या वेळी ते बोलत होते. या वेळी व्यासपिठावर भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे कॉ. प्रकाश रेड्डी, भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष अधिवक्ता प्रकाश आंबेडकर, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे कॉ. महेंद्रसिंह, पत्रकार जतीन देसाई आणि कॉ. शरद कदम उपस्थित होते. (अंनिस सर्वत्रच्या साम्यवाद्यांना व्यासपिठावर स्थान देऊन विचार मांडायला देते. त्या वेळी या साम्यवाद्यांचे केरळमधील भाऊबंद हिंदूंच्या एकामागून एक हत्या करत आहेत, ते अंनिसवाल्यांना चालते आणि सनातनच्या साधकांवर केवळ संशय असल्यावरून अंनिस आकाशपाताळ एक करते. अंनिसचा हा दुटप्पीपणा जाणा ! – संपादक)
या चर्चासत्रात जवळपास सर्वच वक्त्यांनी सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्यावर बिनबुडाचे आरोप केले, तसेच संदर्भहीन टीका केली.

अविनाश पाटील यांचा कांगावा !

१. विचारांचा प्रतिवाद विचारांनी न करणार्‍या, प्रशासन आणि संविधान यांच्या विरोधात असणार्‍या सनातन संस्थेच्या विरोधात आमची लढाई आहे, अशी मुक्ताफळे महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य कार्याध्यक्ष अविनाश पाटील यांनी उधळली. (विचारांचा प्रतिवाद विचारांनी करणे सनातनला मान्य नसते, तर सनातनचे साधक आणि साधिका वृत्तवाहिन्यांवरील चर्चासत्रात कशाला सहभागी झाले असते ? हिंदु धर्मातील प्रथा आणि परंपरा यांवरील आघात किंवा त्यामागील शास्त्र, तसेच धर्माच्या संदर्भातील काही सरकारी निर्णय यांविषयी सनातनचे मत जाणून घेण्यासाठी वृत्तवाहिन्या आणि दर्शक उत्सुक असतात; म्हणून सनातनच्या प्रवक्त्यांना बोलावले जाते. प्रशासनातील भोंगळ कारभार, किंवा त्रुटी दाखवून देणे हे प्रत्येक राष्ट्रप्रेमी नागरिकाचे कर्तव्यच आहे. त्यामुळे सनातन प्रशासनाच्या विरोधात आहे, असा अपप्रचार करणे कितपत योग्य आणि विवेकबुद्धीचे आहे ? सनातनने संविधानानुसार अंनिसच्या विरोधात न्यायालयीन दावे दाखल केलेलेसुद्धा अंनिसला चालत नाहीत. अशा अंनिसच्या अविनाश पाटील यांनी सनातनवर संविधानाच्या विरोधात असल्याचा आरोप करण्यापेक्षा स्वतः संविधानाचा आदर करायला शिकावे ! – संपादक)
२. अंनिसने केलेल्या आंदोलनांमुळे या प्रकरणात न्यायालयीन प्रक्रिया चालू होऊन ते पुढे जात आहे. आतापर्यंत या प्रकरणात सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांचेच नाव आले आहे. सनातन संस्थेने पुढील हत्या कुणाची करायची याची सूची सिद्ध केली आहे. हत्या करण्याचे कट शिजवले आहेत. (हा जावईशोध अविनाश पाटील यांनी कोणत्या आधारावर लावला ? नक्षलवाद्यांशी संबंध असणार्‍या अंनिसला इतरांवर आरोप करण्याचा अधिकार आहे का ? सनातनवर बिनबुडाचे आरोप करणार्‍या अविनाश पाटील यांच्या या विधानांविषयी सनातन कायदेशीर समादेशन घेत आहे. – संपादक) अन्वेषण यंत्रणेतील काही अधिकार्‍यांनी आम्हाला हे वैयक्तिकरित्या सांगितले. (खोटी माहिती देणार्‍या अन्वेषण यंत्रणेतील अधिकार्‍यांची नावे उघड करण्याचे धाडस अंनिस दाखवणार का ? – संपादक)
३. संस्थेकडून सर्वसामान्यांमध्ये भय निर्माण करण्याचे काम चालू आहे. (असे असते, तर गोव्यातील रामनाथी येथील आश्रमात आणि पनवेल येथील आश्रमाला प्रतिदिन जिज्ञासूंनी भेटी दिल्या नसत्या, तसेच समाजातही सनातनच्या उपक्रमांना मिळणारा भरघोस प्रतिसाद मिळाला नसता. सनातनवर खोटे आरोप करण्यापलीकडे अंनिसवाल्यांकडे काही उपक्रमच नाही कि काय ? अशी शंका पाटील यांनी केलेल्या एकामागून एक खोट्या आरोपांवरून येते. – संपादक) असे असूनही सनातन संस्था उजळ माथ्याने फिरते. (कर नाही त्याला डर (भिती) कशाला ? – संपादक)
४. संस्थेचे प्रवक्ते मिजासखोरीने चर्चासत्रांत जाऊन वक्तव्ये करतात. (सनातनच्या प्रवक्त्यांना जाहीरपणे मिजासखोर म्हणणार्‍यांची मिजासखोरी किती असेल ? वैचारिक प्रतिवाद करू न शकणारेच अशी भाषा बोलतात. – संपादक )
५. अन्वेषण यंत्रणा नालायक नाहीत. त्या प्रयत्न करत आहेत; मात्र राजकीय दबावामुळे संस्थेवर कारवाई केली जात नाही. (अविनाश पाटील यांची मुक्ताफळे ! – संपादक)
६. सनातनच्या फरार साधकांचा ५ अन्वेषण यंत्रणा शोध घेत आहेत. नेपाळपर्यंत जाऊनही काहीच हाती लागले नाही, हे न पटण्यासारखे आहे. केवळ मारेकरी सापडून उपयोगी नाही, तर या हत्यांमागील खरा सूत्रधार, त्यांना आर्थिक साहाय्य करणारे यांच्यावरही कारवाई करायला हवी. (शासनाने कायदे आणि संविधान यांनुसार कारवाई करायची कि अंनिसच्या दबावानुसार कारवाई करायची ? संविधानावर कुणाचा विश्‍वास नाही, ते येथे स्पष्ट होते. – संपादक)
७. डॉ. दाभोलकरांच्या हत्येनंतर त्यांचे कुटुंबीय, अंनिसचे प्रमुख, समविचारी संघटनांचे नेते, पक्षप्रमुख यांची चौकशी झाली. आर्थिक गैरव्यवहारांमुळे हत्या झाली का, हेही पाहिले; मात्र हे पाहून मारेकरी मिळाला नाही. (त्या वेळी अन्वेषण यंत्रणांनी राजकारण्यांच्या दबावाखाली येऊन कारवाई केली नसेल, असा निष्कर्ष पाटील का काढत नाहीत ? अंनिसने बेकायदेशीररित्या परदेशातून कोट्यवधी रुपयांचा देणग्या गोळा केल्या आहेत. अनेक वर्षे ट्रस्टचे लेखापरीक्षण केलेले नाही. अंनिसने शासनाचा कर चुकवल्याचे सातारा धर्मादाय आयुक्तांनी दिलेल्या अहवालातून उघड झाले आहे. त्यामुळे डॉ. दाभोलकरांच्या हत्येमागे आर्थिक गैरव्यवहारांचे कारण असू शकते, या दृष्टीने पुन्हा अन्वेषण व्हावे, ही हिंदुत्वनिष्ठ संघटनांची अजूनही मागणी आहे. – संपादक)
८. अन्वेषण यंत्रणांकडे विचारांचा प्रतिवाद विचारांनी न करता हत्या करण्यात येते, ही दिशाच नसल्याने ते या दृष्टीने अन्वेषण करत नाहीत. (अविनाश पाटील यांची द्विधा मनःस्थिती यातून दिसून येते. आधी ते ‘अन्वेषण यंत्रणा नालायक नाहीत. त्या प्रयत्न करत आहेत’, असे म्हणतात, तर काही वेळाने अन्वेषण यंत्रणांना दिशाच नसल्याचा त्यांच्यावर आरोप करतात. – संपादक)

हिंदुद्वेष्ट्यांच्या कार्यक्रमाची दु:स्थिती

अविनाश पाटील यांच्या भाषणापूर्वीच अर्धे श्रोते निघून गेले !

सायंकाळी ५ वाजता चर्चासत्राची वेळ होती; मात्र प्रत्यक्षात ५.४० वाजता चर्चासत्राला प्रारंभ झाला. या चर्चासत्रासाठी अंनिसच्या वतीने समविचारी संघटनांचे कार्यकर्ते आणि पुरोगामी यांना निमंत्रित करण्यात आले होते. चर्चासत्राच्या शेवटी अंनिसचे कार्याध्यक्ष अविनाश पाटील बोलायला उभे राहिले, तेव्हा अर्ध्याहून अधिक श्रोते निघून गेले होते. (एकसारखे तेचतेच आणि बिनबुडाचे आरोप ऐकण्यात प्रेक्षकांनाही कंटाळा आला, तर त्यात नवल नाही ! – संपादक)

चर्चासत्र झालेच नाही, केवळ भाषणे ठोकून कार्यक्रमाची समाप्ती !

‘चर्चासत्र’ या नावाने कार्यक्रमाचे निमंत्रण देण्यात आले होते. प्रत्यक्षात मात्र व्यासपिठावरील वक्त्यांनी भाषणे ठोकल्यावर कार्यक्रम समाप्त करण्यात आला. या वेळी व्यासपिठावर उपस्थित भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी कार्यक्रमाचा मूळ विषय सोडून ‘भाजप आणि नोटाबंदी’, या विषयावर भाषण केले.

सनातनच्या साधकांचा ‘देशद्रोही’ म्हणून उल्लेख करून आरोपींची छायाचित्रे प्रसिद्ध !

या चर्चासत्राच्या ठिकाणी ‘वॉन्टेड’ असा मथळा देऊन सनातनच्या साधकांची छायाचित्रे लावण्यात आली होती. या भित्तीपत्रकांमध्ये ‘सारंग अकोलकर-कुलकर्णी-रूद्र पाटील, प्रवीण लिमकर, जयप्रकाश अण्णा या सनातनच्या साधकांचा ‘देशद्रोही’, असा उल्लेख करण्यात आला होता. (पोलिसांनी यावर कारवाई का केली नाही ? सनातनच्या कार्यक्रमांत अंनिसवाल्यांची आणि साम्यवाद्यांची देशद्रोही म्हणून छायाचित्रे प्रसिद्ध केली, तर शासनाला चालणार आहेत का ? याविषयी सनातन तक्रार करून कारवाईची मागणी करणार आहे ! – संपादक)

विरोधकांच्या हत्या, हाच इतिहास असणार्‍या साम्यवाद्यांची गरळओक !

१. (म्हणे) सनातनच्या आश्रमामधील मुख्य आठवले यांनी खून कसे करावेत ? याविषयी ‘मॅन्युअल’ काढले आहे ! : प्रकाश रेड्डी, भारतीय कम्युनिस्ट पक्ष

सनातनच्या आश्रमामध्ये जे मुख्य आठवले बसले आहेत, त्यांनी खून कसे करावेत ? याविषयी मॅन्युअल काढले आहे. त्यामध्ये खून कसे करावेत ? खून करणे कसे योग्य आहे, ते धार्मिक सत्कृत्य कसे आहे, असे सांगितले आहे, असे वक्तव्य भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे प्रकाश रेड्डी यांनी केले. (असे आहे, तर हे ‘मॅन्युअल’ प्रकाश रेड्डी यांनी अन्वेषण यंत्रणांना अद्याप सादर का केले नाही ? यातूनच त्यांचा खोटारडेपणा दिसून येतो. अखिल मानवजातीच्या कल्याणार्थ अहोरात्र झटणारे परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या विरोधात असे वक्तव्य करणे म्हणजे सूर्यावर थुंकण्याचा अश्‍लाघ्य प्रकार आहे ! सनातन संस्था रेड्डी यांच्या विरोधात कायदेशीर कारवाईसाठी अधिवक्तांचे समादेशन घेत आहे. – संपादक)
प्रकाश रेड्डी यांनी सनातनद्वेषातून मांडलेली अन्य सूत्रे !
१. सनातनच्या आश्रमांना टाळे लावले पाहिजे आणि आश्रम पूर्णपणे बंद झाले पाहिजेत, तरच हे बंद होईल. ही एकच संस्था नाही, तर आतंकवादी कारवाया करणार्‍या अशा अनेक संस्था आहेत. (सनातनवर बंदीसाठी साम्यवादी ज्यांचे सत्तेतील भागीदार आहेत, त्या काँग्रेसने प्रयत्न केले होते; पण तसे पुरावेच नसल्याने काँग्रेस तोंडघशी पडली आणि नंतर तिला सत्ताही गमवावी लागली. – संपादक)
२. यांचे उघड स्वरूप जनतेसमोर स्पष्टपणे आले आहे, तरी यांच्यावर कारवाई का होत नाही ? जे काय आहे ते स्वच्छ दिसते आहे. (सनातनचे स्वरूप कॉम्रेडवाल्यांना दिसते तसे नाही. सनातनद्वेषाची कावीळ झालेल्यांना सर्व पिवळेच दिसत असले, तरी ते प्रत्यक्षात तसे नसते. – संपादक)
३. सनातन संस्था काही आज उभी राहिलेली नाही आणि त्यांचे स्वरूपही आज उघड झालेले नाही. वर्ष २००९ ला झालेल्या मडगाव स्फोटात सरळसरळ सनातन संस्थेचे नाव आले. (मडगाव स्फोट प्रकरणी सनातनचे नाव कुठेच नाही. या प्रकरणात सनातन संस्थेला साधी नोटीससुद्धा आली नाही. केवळ राजकीय लाभासाठी काहींनी सनातनवर आरोप केले होते. जसे आजही होत आहेत. उलट मडगाव स्फोट प्रकरणात अटक झालेल्या सनातनच्या सर्व साधकांची निर्दोष सुटका करतांना न्यायालयाने ‘सनातन संस्थेला गोवण्याच्या उद्देशानेच या प्रकरणात प्रथमदर्शी अहवाल नोंदवला गेला आहे’, असा अन्वेषण यंत्रणांना फटकारणारा शेरा मारला आहे. प्रकाश रेड्डी यांनी हा निकाल संकेतस्थळावर तरी वाचावा ! – संपादक)
४. हे ‘सनातन संस्थेचे साधक आहेत’, असे लिहून डॉ. दाभोलकर आणि कॉ. पानसरे यांच्या खुनातील आरोपींची चित्रे सर्वत्र लावली पाहिजेत. (चिथावणीखोर आणि प्रक्षोभक वक्तव्ये केल्याविषयी पोलीस प्रकाश रेड्डी यांच्यावर कारवाई करतील का ? – संपादक) यांचे सामाजिक स्वरूप शासनानेच उघड केले पाहिजे. (केरळ येथे राजरोसपणे संघ आणि भाजपचे कार्यकर्ते यांची हत्या करणार्‍यांचीही अशीच चित्रे लावून ‘हे साम्यवादी आहेत’, असे फलक लावायचे का ? – संपादक)

२. (म्हणे) ‘सनातन संस्था, संघ आणि शासन यांची मिलीभगत बाहेर आणण्याची आवश्यकता !’ :  जतीन देसाई, पत्रकार


यापुढे आमदार, खासदार यांच्या घरांपुढे निदर्शने करून आपले आंदोलन व्यापक केले, तरच लोकांच्या लक्षात येईल. सनातन संस्था, संघ आणि शासन यांची मिलीभगत बाहेर आणण्याची आवश्यकता आहे. (जतीन देसाई यांनी हा निष्कर्ष कोणत्या आधारावर काढला कि साम्यवादी आणि अंनिसवाल्यांच्या संपर्कात राहून तेही खोटारडेपणा अन् बिनबुडाची वक्तव्ये करायला शिकले ? अशा पत्रकारांमुळेच पत्रकारिता रसातळाला गेली आहे. – संपादक)

विशेष आभार / दैनिक सनातन प्रभात वृत्तपत्र व संकेतस्थळ 

Monday, December 19, 2016

जिल्हा परिषद सदस्यांनाही पक्षांतरबंदी कायदा लागू -निवडणुकीतील घोडेबाजार रोखण्यासाठी

मुंबई - 


जिल्हा परिषदांच्या निवडणुकीतील घोडेबाजार रोखण्यासाठी खासदार, आमदार आणि नगरसेवकांपाठोपाठ आता जिल्हा परिषद सदस्यांनाही पक्षांतरबंदी कायदा लागू करण्यात आला आहे. निवडून आल्यानंतर दुसर्‍या पक्षात प्रवेश केल्यास जिल्हा परिषद सदस्यांचे सदस्यत्व रद्द करण्यात येणार असून, त्यांना सहा वर्षे निवडणूक लढविण्यास बंदी घालण्यात आली आहे.
एखाद्या पक्षातून निवडून आल्यानंतर लाभासाठी काही सदस्य सर्रासपणे दुसर्‍या पक्षात जातात. कधी पक्षांतरासाठी या सदस्यांना आमिषेही दाखविली जातात. असे केल्याने लोकशाहीच्या मूलभूत तत्त्वांना हरताळ फासला जातो. त्यामुळे या प्रकारांना आळा घालण्यासाठी जिल्हा परिषद सदस्यांनाही पक्षांतरबंदी कायद्याच्या कक्षेत आणण्यात आले आहे. पावसाळी अधिवेशनात हे विधेयक विधान परिषदेत मंजूर झाले आहे. आता विधानसभेनेही यास मंजुरी दिल्याने अंतिम मंजुरीसाठी हे विधेयक राज्यपालांकडे पाठविण्यात आले आहे. राज्यपालांची मंजुरी मिळताच त्याची अंमलबजावणी सुरू होणार आहे.

Monday, November 7, 2016

दारूबंदी कायदा होण्यासाठी लढा चालू करणार ! - अण्णा हजारे

Image resultमुंबई - मद्य पिऊन महिलांवर होत असलेले अत्याचार आणि ग्रामीण भागातील वाढती व्यसनाधीनता लक्षात घेऊन दारूबंदी कायदा व्हावा, यासाठी लढा चालू करणार आहोत, अशी घोषणा ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांनी ६ नोव्हेंबर या दिवशी केली. या कायद्याचा मसुदाही सिद्ध झाला असून मुख्यमंत्र्यांनीही त्याला अनुकूलता दर्शवली आहे. तडीपारी आणि सश्रम कारावास यांची शिक्षा यांसारख्या तरतुदी या कायद्यात आहेत, असे हजारे यांनी सांगितले.

Saturday, November 5, 2016

निवडणूक प्रक्रियेबद्दल माहिती प्रभावीपणे पोहचविण्यामध्ये लोकराज्यची महत्त्वाची भूमिका - ज.स.सहारिया

मुंबई -

राज्यातील पंचायत समित्या, जिल्हापरिषदा, नगरपालिका आणि महानगरपालिका यांच्या निवडणुका नोव्हेंबर-2016 ते मार्च-2017 या कालावधीत होत आहेत. या निवडणुकांच्या प्रक्रियेबद्दलची सविस्तर माहिती सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहचवण्यामध्ये लोकराज्य मासिक महत्वाची भूमिका बजावत असल्याचे गौरवोद्गार राज्य निवडणूक आयुक्त ज.स.सहारिया यांनी काढले.
माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत प्रकाशित होणाऱ्या लोकराज्य मासिकाच्या नोव्हेंबर-2016 च्या अंकाच्या प्रकाशनप्रसंगी ते बोलत होते. राज्य निवडणूक आयोगाचे सचिव शेखर चन्ने, माहिती सचिव तथा महासंचालनालयाचे महासंचालक ब्रिजेश सिंह, माहिती संचालक अजय अंबेकर ,देवेंद्र भुजबळ यावेळी उपस्थित होते.
लोकराज्य मासिकाद्वारे या निवडणुकीचा वृत्तांत या पुढील अंकामध्येही समाविष्ट करण्यात येईल, जेणेकरुन निवडणुकीबद्दलची सजगता वाढण्यास मदत होईल, असे प्रतिपादन माहिती सचिव तथा महासंचालनालयाचे महासंचालक ब्रिजेश सिंह यावेळी केले.
राज्यातील 192 नगरपरिषदा व 20 नगर पंचायतींच्या निवडणूकांबद्दलची सविस्तर माहिती या अंकात देण्यात आली असून निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर राज्य निवडणूक आयुक्त ज.स.सहारिया यांच्या मुलाखतीचा समावेश अंकात करण्यात आला आहे. नगर पंचायती आणि नगर परिषदांच्या अध्यक्षपदाच्या आरक्षण सोडतीची संपूर्ण माहितीही या अंकात देण्यात आली आहे.
संविधान दिवसानिमित्त “परिवर्तनाचे साधन” हा डॉ.बबन जोगदंड यांचा ज्येष्ठ पंचागकार दा.कृ.सोमण यांचा “दीपोत्सव” या विषयावरील लेख तर ज्येष्ठ पर्यावरणतज्ज्ञ प्रा.विद्याधर वालावलकर यांचा फटाके जरा सांभाळून, अजय वाळिंबे यांचा “समृध्दीच्या स्मार्ट दिशा” हे आणि इतर लेखही अंकात समाविष्ट करण्यात आले आहे.
हा अंक सर्व जिल्हा माहिती कार्यालयांमध्ये तसेच माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, महाराष्ट्र शासन, हुतात्मा राजगुरु चौक, मादाम कामा मार्ग, मंत्रालय, मुंबई-400 032येथे उपलब्ध आहे. अंकाची किंमत 10 रुपये असून वार्षिक वर्गणी रुपये 100/- आहे.
लोकराज्य मासिकाची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत असून ऑडिट ब्यूरो ऑफ सक्यूर्लेशन या संस्थेने जून-2015 ते डिसेंबर-2015 या कालावधीसाठी लोकराज्य मासिकाचा खप 3 लाख 88 हजार असल्याचे प्रमाणित केले आहे. गेल्या तीन महिन्यात लोकराज्यचे वर्गणीदार सुमारे 50 हजारांनी वाढले असून राज्यातील सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचण्याचे ते प्रभावी माध्यम ठरत आहे.

Monday, October 31, 2016

माय मराठीच्या संचालकाविरुद्ध बलात्काराचा गुन्हा प्रविष्ट

खाजगी दूरचित्रवाहिन्यांचे विकृत स्वरूप !


        मुंबई - माइंडसेट ट्रेनिंगच्या नावाखाली एका २१ वर्षीय तरुणीचे नग्न चित्रीकरण आणि छायाचित्रे काढून ते सामाजिक संकेतस्थळांवर ठेवण्याची (अपलोड) धमकी देत बलात्कार केल्याचा गुन्हा माय मराठी या दूरचित्रवाहिनीच्या संचालकाविरुद्ध नोंदवण्यात आला आहे. (अशांना पोलिसांनी तात्काळ अटक करून कठोर कारवाई करणे आवश्यक आहे. स्त्रियांवरील वाढत्या अत्याचाराच्या घटना हे कायदा-सुव्यवस्थेचे धिंडवडे निघाल्याचेच लक्षण होय ! - संपादक) 
१. ही तरुणी मूळची रत्नागिरी येथील रहिवासी असून नालासोपारा येथे तिच्या नातेवाइकांकडे रहाते. माय मराठी दूरचित्रवाहिनीमध्ये प्रमुख वार्ताहरची जागा रिकामी असल्याचे समजताच ती मुलाखतीसाठी तेथे गेली. 
२. मुलाखतीच्या वेळी प्रतिमास ३० सहस्र वेतन, चाकरी पाहून वंदे मातरम् प्रतिष्ठानच्या वतीने एक मर्सिडीज आणि एक सदनिका देण्यात येईल, असे आमिष माय मराठी दूरचित्रवाहिनीचे संचालक आणि वंदे मातरम् प्रतिष्ठानचे प्रवक्ते आभास पाटील यांनी दाखवले. 
३. त्यानंतर ती तरुणी १ डिसेंबरपासून कामावर रुजू झाली आणि माइंडसेट ट्रेनिंगच्या नावाखाली त्या तरुणीवर ६ मास अत्याचार केले, असा आरोप तिने केला आहे. पाटील यांच्या वाढत्या अत्याचाराला तिने कंटाळून २५ जुलै या दिवशी तिने नोकरी सोडली; परंतु तरीही पाटील तिला मानसिक त्रास देत होता. अखेर तरुणीने तिच्या मैत्रिणीला झालेला प्रकार सांगून गोरेगाव पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली.

सूचना

विदर्भ24न्यूज़ पोर्टल को बेहतर बनाने में सहायता करें और किसी खबर या अंश मे कोई गलती हो या सूचना / तथ्य में कोई कमी हो तो हमसे संपर्क करे - 9421719953

 
Copyright © 2014 Vidarbha Latest News विदर्भ24न्यूज Amravati Letest News. Template Designed by Vidarbha24news - या इंटरनेट न्यूज चॅनेल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही.