चांदुर रेल्वे - (शहेजाद खान ) -
बळीराजा रात्रंदिवस परीश्रम घेऊन आपल्या काळ्या आईच्या कुशीतून जास्तीत जास्त उत्पन्न घेण्याचा प्रयत्न करीत असतांना अस्मानी संकट केव्हा येईल व ह्याचे उत्पन्न केव्हा नष्ट होईल हे सांगता येणे कठीण बाब झालेली आहे. अशातच तालुक्यात काही संत्रा उत्पादक शेतकर्यांच्या संत्रा बागामध्ये थोडा थोडा का होईना संत्रा झाडांवर दिसत होता आणि भाव सुध्दा चांगले असल्याचे ऐकावयास येत असतांनाच अचानक ह्या संत्रा फळांवर पांढर्या माशीचा प्रादुर्भाव दिसत असून सगळे बगीचे खाली होतांना दिसत आहे. यामुळे शेतकरी खूपच हवालदिल झालेला दिसत आहे.
चांदुर रेल्वे तालुक्यात संत्राबागा बर्यापैकी असून यामध्ये १० ते २० टक्के शेतकर्यांच्या शेतात आंबीया बहाराची संत्री दिसत होती व ह्या संत्राला भाव सुध्दा बर्यापैकी मिळणार ह्या आशेने शेतकरी सुखावला व ह्या थोड्या थोड्या का होईना आलेल्या संत्राबागांवर इकडून - तिकडून पैसा आणून अनेक प्रकारच्या फवारण्या, खते, पाण्याचा बरोबर लागेल तसा तसा उपयोग आदिंवर भर देऊन रंगीत स्वप्न रंगविणार्या ह्या बळीराजाची या ऑगस्ट महिन्यात परिस्थिती मात्र विचित्र दिसत आहे. कारण संत्रा फळ एक महिना ते दीड महिन्यात तोडण्यासाठी येत असून आता मात्र पांढर्या माशीचा ह्या संत्रांवर डंख दिसत आहे. यामुळे हे डंख मारलेले संत्री खाली गळताना दिसत आहे. फुलांपासून, बहारापासून, लहान-लहान फळांपासून मोठी फळे जेव्हा तयार झाली तेव्हा मात्र असे अस्मानी संकट ह्या बळीराजांवर यावे ही फारच दुर्दैवी बाब म्हणावी लागले. या अगोदर जुन जागते नागरिक म्हणाचे की, ज्यांच्याकडे संत्राबागा, मोसंबी बागा, निंबू बागा आहेत अशा बगाईतदार शेतकर्यांना उत्पन्न हमखास होते व ज्याची प्रगती अचानकपणे नुकसन होत असेल तर ह्या बाबीला काय म्हणावे? म्हणून निसर्गाच्या भरवशावर अवलंबून राहणार्या शेतकर्यांच्या शेतात केव्हा कोणती नैसर्गिक आपत्ती येईल ही बाब सांगणे कठीण आहे.
यामुळे हा बळीराजा आत्महत्या सारख्या अघोरी मार्गाचा अवलंब करण्याअगोदर त्याला वेळीच मायबाप शासनाने संत्रा बागाईतदार शेतकर्यांना हेक्टरी १ लाख रूपये मदत द्यावी, अशी मागणी संत्रा उत्पादक शेतकरी अरूणराव शेळके, शिवाजीराव चौधरी, सुरेशराव सोळंके, मनोहर वाघ, राजाभाऊ भैसे, नंदकिशोर खेरडे, आशुतोष गुल्हाने, सुरेशराव वाघ, महात्मे साहेब, राजुभाऊ चौधरी, मदनभाऊ पाठक, मोहन दुबे, दिपक गोरडे आदिंनी केली आहे.