BREAKING NEWS

Tuesday, April 12, 2016

वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने विशेष दुरूस्ती व सुधारणा कार्यक्रमांतर्गत बल्लापूर विधानसभा क्षेत्रात 13.85 कोटी रू. किंमतीची रस्त्यांची कामे मंजूर

बल्लारशहा / प्रवीण गोंगले /---    http://www.vidarbha24news.com/ShowNews.aspx?id=2308


वित्तमंत्री तथा चंद्रपूर जिल्हयाचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने बल्लारपूर विधानसभा क्षेत्रात 13.85 कोटी रू. किंमतीची रस्त्यांची कामे मंजूर करण्यात आली आहेत. रस्त्यांची विशेष दुरूस्ती व सुधारणा कार्यक्रमांतर्गत ही रस्त्यांची कामे मंजूर करण्यात आली आहेत. यात प्रामुख्याने मुल-चामोर्शी या राज्य मार्गाचे 2 कोटी रू. किंमतीचे डांबरीकरणाचे काम, मोहर्ली-चंद्रपूर-जुनोना-गिलबिली-पोंभुर्णा-नवेगांव मोरे या 1.50 कोटी रु. किंमतीच्या रस्त्याचे बांधकाम, सुशी-जानाळा-पोंभुर्णा-चिंतलधाबा-वेळगाव-कोटगाव-गोंडपिपरी या 2 कोटी रू. किंमतीच्या रस्त्याचे बांधकाम, पेठगाव-भादुर्णी-मुल-चिचाळा-भेजगाव या 2.95 कोटी रू. किंमतीच्या रस्त्याचे बांधकाम, मोहर्ली-चंद्रपूर-जुनोना-गिलबिली-पोंभुर्णा-नवेगांव मोरे ते चंद्रपूर वळण मार्गासह 2.50 कोटी रू. किंमतीच्या रस्त्याचे बांधकाम, कोळसा-झरी-पिंपळखुट-नंदगुर-अजयपूर-केळझर-चिरोली-ताडाळा या गावांना जोडणाऱ्या 90 लक्ष रू. किंमतीच्या रस्त्याचे बांधकाम आणि बामणी-गोंडपिपरी या 2 कोटी रू. किंमतीच्या रस्त्याचे बांधकाम या कामांचा समावेश आहे. ग्रामीण भागातील जनतेची रस्त्यांच्या दुरूस्ती व सुधारणेबाबतची प्रलंबित मागणी या माध्यमातून पूर्णत्वास येत आहे. 13.85 कोटी रू. किंमतीची ही कामे मंजूर केल्याबद्दल भाजपाचे ज्येष्ठ नेते चंदनसिंह चंदेल, भाजपाचे जिल्हा अध्यक्ष हरिश शर्मा, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सौ. संध्या गुरनुले, पोंभुर्णा नगर पंचायत अध्यक्ष गजानन गोरंटीवार, बापूजी चिंचोलकर, हनुमान काकडे, लोकचंद कापगते, गौतम निमगडे, जि.प. सदस्य शांताराम चौखे, हंसराज रायपुरे, विलास टेंभुर्णे, चंदू मारगोनवार, नंदू रणदिवे, दिवाकर फाले, सौ. रेखा गद्देवार, मुलच्या नगराध्यक्षा सौ. रिना थेरकर, अनिल संतोषवार, प्रविण मोहुर्ले, तुळशिराम कुंभारे, सौ. वंदना फाले, सौ. वंदना आगरकाठे, जि.प. सदस्या अलका आत्राम, सौ. वर्षा परचाके, राहुल संतोषवार, अजित मंगळगिरीवार, हरिश ढवस, ईश्वर नैताम, किशोर पंदिलवार, रमेश  पिपरे, राजू बुध्दलवार, महेश रणदिवे, वासुदेव गावंडे आदी भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे आभार व्यक्त करत अभिनंदन केले आहे.

Share this:

Post a Comment

सूचना

विदर्भ24न्यूज़ पोर्टल को बेहतर बनाने में सहायता करें और किसी खबर या अंश मे कोई गलती हो या सूचना / तथ्य में कोई कमी हो तो हमसे संपर्क करे - 9421719953

 
Copyright © 2014 Vidarbha Latest News विदर्भ24न्यूज Amravati Letest News. Template Designed by Vidarbha24news - या इंटरनेट न्यूज चॅनेल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही.