BREAKING NEWS

Tuesday, April 12, 2016

चांदुर रेल्वे येथील 'आम इज्तेमा'मधील प्रार्थने (दुआ) मध्ये उसळला जनसैलाब. तब्बल अंदाजे दोन लाख मुस्लीम बांधवांची उपस्थीती.

*शहेजाद खान/ चांदूर रेल्वे * /--
 http://www.vidarbha24news.com/ShowNews.aspx?id=2310




 समाजातील वाईट प्रवृत्ती नष्ट करून, समाज बांधवांमध्ये जातीय सलोखा निर्मान व्हावा यासाठी मुस्लिम समाजातर्फे प्रत्येक ठिकाणी 'इज्तेमा'चे आयोजन करण्यात येते. याच अनुषंगाने अमरावती जिल्हास्तरीय दिनी आम इज्तेमाचे आयोजन प्रथमच चांदूर रेल्वे शहरात ९ ते ११ एप्रिल दरम्यान करण्यात आले होते. या इज्तेमाच्या अंतिम दिवशी सोमवारी सकाळी ७ वाजता झालेल्या प्रार्थनेमध्ये (दुआ) जनसैलाब उसळला होता. यामध्ये तब्बल जवळपास २ लाख नागरीकांची उपस्थिती होती. या कार्यक्रमासाठी चांदूर रेल्वे शहरापासून २ किलोमीटर अंतरावरील चांदूरवाडी येथे तब्बल ६५ एकर जागेमध्ये दीड लाख स्वेअर फूट जागेत भव्य असा मंडप उभारण्यात आला होता. या शिवाय येणाऱ्या सर्व नागरिकांसाठी पार्किंगची व्यवस्था करण्यात येत आहे. या कार्यक्रमासाठी जवळजवळ १५० शौचालय, बाथरूमचे काम करण्यात आले होते. या इज्तेमामध्ये अमरावती जिल्ह्याच्या व्यतिरिक्त अकोला, खामगाव, बुलढाणा, वर्धा, यवतमाळ, नागपूर, वाशीम आदी जिल्ह्यातूनही मुस्लिम बांधवानी प्रामुख्याने उपस्थीती दर्शविली. इस्तेमामध्ये सामील झालेल्या सर्व समाज बांधवांना रास्त भावात पोटभर जेवणासाठी केवळ ३० रुपये मोबदला घेण्यात आला. यासाठी सहा हॉटेल्सची व्यवस्था करण्यात आली होती. याच ठिकानी सर्व समाजबांधवांची नमाजची व्यवस्था सुध्दा करण्यात आली होती. त्यांच्या वजू करण्यासाठी २ हजार नळांची व्यवस्था सुध्दा करण्यात आली होती. ठिकठिकानी थंड पाण्याची, शरबतची तसेच पाणीपाउचची व्यवस्था शहरवासीयांतर्फे तीनही दिवस करण्यात आली. ह्याच परिसरात भव्य असा बाजार लागला होता. त्यामध्ये सर्व प्रकारची दुकाने होती. शेवटच्या दिवशी खरेदीसाठी दुकांनावरही मोठी गर्दी बघायला मिळाली. या तीन दिवसात अमरावतीतच नव्हे तर दिल्ली, अकोला तसेच इतरही ठिकाणच्या अति महत्त्वाचे धर्मगुरूंचे विशेष मार्गदर्शन लाभले. त्यांच्या सोबतच सर्व नमाजचे पठन सुध्दा येथेच झाले. या दिनी इज्तेमाचे आयोजन समाजातील अनिष्ट चालीरिती, क्रूरता आदिंनी नष्ट करून समाजात शांती नांदावी, यासाठी ह्याचे आयोजन करण्यात येते. यामध्ये दि. ११ एप्रिलला सकाळी ७ वाजता विशेष धर्मगुरूंच्या प्रमुख उपस्थितीत सुख शांतीसाठी प्रार्थना (दुआ) झाली. या प्रार्थनेला विशेष महत्त्व असल्यामुळे यासाठी तब्बल अंदाजे २ लाख समाज बांधव उपस्थित होते. प्रार्थनेनंतर जातेवेळी कोणत्याही प्रकारची वाहतुक विस्कळीत न करता चांदुर रेल्वे तालुक्यातील मुस्लीम बांधवांनी अथक परीश्रमाने वाहतुक सुरळीत सुरू ठेवली. या कार्यक्रमाची रूपरेषा गेल्या २ महिन्यापासून तयार करण्यात आली होती. त्यासाठी विविध प्रकारच्या कमेट्यांचे गठन करण्यात आले होते. ह्या इज्तेमाला सफल बनविण्यासाठी शहर-तालुक्यातील युवक, समाजबांधव तसेच जिल्ह्यातील अनेक समाजबांधवांनी आपआपल्यापरीने तन-मन-धनाने प्रयत्न केले. Vidarbha News Chandur Relwe News , Amravati News

Share this:

Post a Comment

सूचना

विदर्भ24न्यूज़ पोर्टल को बेहतर बनाने में सहायता करें और किसी खबर या अंश मे कोई गलती हो या सूचना / तथ्य में कोई कमी हो तो हमसे संपर्क करे - 9421719953

 
Copyright © 2014 Vidarbha Latest News विदर्भ24न्यूज Amravati Letest News. Template Designed by Vidarbha24news - या इंटरनेट न्यूज चॅनेल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही.