रायचूर (कर्नाटक) -

येथील नगरपरिषदेने रस्ता रुंदीकरण्याच्या आड येणार्या एका मंदिरासह दोन मशिदी अंशत: पाडल्यावर एका मशिदीच्या आत हिंदूंच्या प्राचीन मंदिराचे खांब सापडल्याचे वृत्त समोर आले आहे. पब्लिक टीव्ही या कर्नाटक राज्यातील प्रसिद्ध वृत्तवाहिनीवर हे वृत्त प्रसारित करण्यात आले आहे.
प्रशासनाने सदर मशिदी पाडू नयेत, म्हणून धर्मांधांनी नगरपरिषद अधिकार्यांवर मोठ्या प्रमाणात दगडफेक केली.
द हिंदू या इंग्रजी वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार, रायचूर शहरातील झाकीर हुसेन चौक आणि सुपरमार्केट चौक यांमधील रस्ता रुंदीकरणासाठी नगरपरिषदेने रस्त्याच्या दोन्ही बाजूला असलेल्या व्यावसायिक आणि धार्मिक इमारती पाडण्याचा निर्णय घेतला होता. त्यासाठी व्यावसायिकांना, तसेच एक मंदिर अन् दोन मशिदी यांच्या व्यवस्थापनांना नोटिसाही देण्यात आल्या होत्या. याशिवाय त्यांच्याशी चर्चाही झाली होती. सदर दोन मशिदींपैकी एक मिनार की मस्जिद नावाची शहरातील प्रसिद्ध मशीद आहे. धार्मिक स्थळे संपूर्णतः न पाडता त्यांचा थोडाच भाग पाडण्यात येणार होता. एक मिनार की मस्जिद या मशिदीच्या व्यवस्थापनाने ती पाडण्यासाठी हिरवा कंदील दाखवल्यावरही धर्मांधांनी ती पाडण्यास तीव्र विरोध केला. पब्लिक टीव्ही या कर्नाटकातील प्रसिद्ध वृत्तवाहिनीने दिलेल्या माहितीनुसार, जेव्हा एक मिनार की मस्जिद अंशत: पाडण्यात आली, तेव्हा मशिदीच्या भिंतींचा गिलावा (प्लास्टर) निघाल्यावर त्यावर हिंदूंची धार्मिक चिन्हे कोरली असल्याचे दिसून आले. मंदिराचे खांबही असल्याचे दिसू लागले. तीन खांब पाहून ही मशीद एकतर हिंदू पद्धतीनुसार बांधण्यात आली असावी किंवा ते मूळचे रामलिंगेश्वर मंदिर असावे, अशी चर्चा चालू झाली.
या घटनेतून जातीय तणाव निर्माण होऊ नये, म्हणून नगरपरिषदेने मशिदीचे खांब आणि इतर अवशेष लांबवर नेऊन टाकले. मात्र धर्माभिमानी हिंदूंनी त्यातील शक्य तेवढे अवशेष गोळा करून जपून ठेवले असल्याचे वृत्त आहे.

Post a Comment