नागपूर -

www.vidarbha24news.com
जेएन्यूतील विद्यार्थी कन्हैय्या कुमारच्या जाहीर व्याख्यानाचे आयोजन येत्या १४ एप्रिल या दिवशी धनवटे नॅशनल कॉलेज येथे करण्यात आले आहे; परंतु कन्हैय्या हा देशद्रोही असून आमचा त्याच्या भाषणाला आणि त्यालाही विरोध आहे. जो देशाचे तुकडे करा, अशी वक्तव्ये करतो, जो भारतीय सैनिकांना बलात्कारी म्हणतो, त्याला आम्ही नागपुरात पायसुद्धा ठेवू देणार नाही. त्याने शहरात पाय ठेवला, तर त्याचे पाय तोडू, अशी चेतावणी बजरंग दलाचे शहर संयोजक राजकुमार शर्मा यांनी दिली आहे. ते दलाने आयोजित केलेल्या एका पत्रकार परिषदेत बोलत होते. शर्मा म्हणाले की, शहरातील काही लोक स्वार्थाकरिता कन्हैय्यासारख्यांना प्रोत्साहन देत आहेत, ही खेदाची गोष्ट आहे. त्याला शहरात प्रवेश नाकारावा, असे निवेदन आम्ही शहर पोलिसांना देणार आहोत. तसेच हा कार्यक्रम धनवटे नॅशनल कॉलजने रहित करावा, असेही निवेदन आम्ही या महाविद्यालयाच्या प्रशासनाला देणार आहोत. असे करूनही हा कार्यक्रम झाल्यास शहरातील कायदा आणि सुव्यवस्था धोक्यात येईल आणि त्याला पोलीसच उत्तरदायी असतील.

Post a Comment