संगमनेर/--
१२ एप्रिल -

ज्या वेळेस आपल्याला असे वाटेल की, आम्हाला संघटित व्हायचे आहे, आम्ही सर्व ईश्वराची लेकरे असून एकच आहोत, त्या वेळी प्रत्येक संघटना आणि प्रत्येक व्यक्ती आतून एकत्र आहे, हे आपल्या लक्षात येईल, तेव्हाच आम्ही सर्वजण हिंदु राष्ट्राच्या जवळ जाऊ. ज्याप्रमाणे आपण भगवंताच्या मंदिरात जातांना चप्पल बाहेर काढून दर्शनाला जातो, त्याप्रमाणे आपल्याला संघटना आणि जातीपाती यांची वल्कले बाहेर काढून एकत्र यायचे आहे, तरच आपण हिंदु राष्ट्राच्या जवळ जाऊ आणि हिंदु राष्ट्र स्थापन होईल, असे प्रतिपादन सनातन संस्थेचे प्रवक्ता श्री. अभय वर्तक यांनी केले. विश्व हिंदु परिषद, बजरंग दल आणि प्रभु श्रीराम जन्मोत्सव समिती प्रखंड यांच्या संयुक्त विद्यमाने गुढीपाडवा, प्रभु श्रीराम जन्मोत्सव आणि डॉ. हेडगेवार यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात ते हिंदु-राष्ट्र या विषयावर मार्गदर्शन करत होते. येथील मातोश्री लॉन्स आणि मंगल कार्यालय येथे १० एप्रिल या दिवशी व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी व्यासपिठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून ह.भ.प. कल्याणजी महाराज, विहिंपचे जिल्हा सहमंत्री श्री. प्रशांत बेल्हेकर, बजरंग दलाचे जिल्हा संयोजक श्री. सचिन कामकाटे आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संगमनेर विहिंपचे शहराध्यक्ष श्री. सुरेश कालडा यांनी केले. या प्रसंगी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे तालुका सरसंघचालक श्री. अशोक सराफ, शिवसेनेचे संगमनेर शहरप्रमुख श्री. अमर कतारी, शिवजयंती युवक समितीचे उपाध्यक्ष श्री. मंगेश साळवे, बजरंग दलाचे संगमनेर शहर आणि तालुका संयोजक श्री. योगेश सूर्यवंशी यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने धर्माभिमानी उपस्थित होते.
या वेळी श्री. वर्तक पुढे म्हणाले की, हिंदु राष्ट्र स्थापन करायचे तर प्रखर राष्ट्राभिमान, शिस्त, नैतृत्व, साधनेचे बळ पाहिजे. हिंदु राष्ट्र स्थापनेत भगवान श्रीकृष्णाचा आशीर्वाद सर्वांत अधिक महत्त्वाचा आहे. भगवंत हिंदु राष्ट्र स्थापन करणारच आहे. आपण त्याचे साक्षीदार आणि पाईक बनूया. संघटना, जातपात आणि कार्य यांचा अहंकार बाळगल्यास आपण हिंदु राष्ट्रापासून दूर जाणार, हेही लक्षात घेतले पाहिजे. त्यापेक्षा मी भगवान श्रीकृष्णाचा सेवक आहे, धर्मरक्षण आणि धर्मकार्य करणे, ही भगवंताने दिलेली सेवा आहे, असा भाव ठेवल्यास आपण हिंदु राष्ट्राच्या आणखी जवळ जाऊ.

Post a Comment