पनवेल -

पनवेलमधील आसूडगाव येथील व्हिक्टोरिया पेट्रोल पंपाला १२ एप्रिल या दिवशी सकाळी साडेनऊ वाजता आग लागली. पेट्रोल पंपावर दोन गाड्यांमधून टँकमध्ये पेट्रोल आणि डिझेल भरण्याचे काम चालू असतांना ही दुर्घटना घडली.
घटनेची माहिती मिळताच सिडकोच्या चार आणि पनवेल नगरपरिषदेची एक अग्निशमनदलाची गाडी घटनास्थळी दाखल झाली. आग लागल्यापासून एका घंट्याने आग विझवण्यात अग्निशमनदलास यश आले. या आगीमध्ये पंपाच्या वाहनतळामध्ये (पार्किंग) मध्ये उभा असलेला एक ट्रक आणि दोन कंटेनर जळून खाक झाले आहेत. ही आग टँकरमध्ये ठिणगी पडून लागली असावी, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

Post a Comment