गोंदिया /अजय मेश्राम
स्थानिक गोंदिया मधील तक्रारदार महादेव रेती घाटचा ठेका जिल्हाधिकारी कार्यालय
मधून प्राप्त झाला होता या बाबतीत तक्रारदार
यांना जिल्हाधिकारी कार्यालय कडून प्राप्त रेतीघाटाव्यतिरिक्त लिलाव न
झालेल्या रेतीघाटातून रेतीचे उत्खनन केल्यामुळे त्यांना करणे दाखवा
नोटीस प्राप्त झाले होते याचबाबतीत सदर तक्रारदार हे श्री विनय कौलवकर (नायब
तहसीलदार तथा प्रभारी जिल्हा खनिकर्म अधिकारी) यांना भेटले त्यांनी सदरचा कारणे दाखवा नोटीसचा
निपटारा करण्यासाठी व त्यांचा रेती घाटावर कोणतीही कारवाई न करण्याकरिता २ लाख
इतक्या मोठ्या लाचेची मागणी केली होती परंतु सदर तक्रारदार यांना इतकी मोठी रक्कम
द्यायची मुळीच इच्छा न्हवती म्हणून त्यांनी याबाबत लाच लुचपत विभाग नागपूर येथे
याबाबत तक्रार दाखल केली सदर तक्रारीवरून
१२/०४/२०१६ रोजी लाच लुचपत विभाग नागपूर तर्फे सापळा रचून कार्यवाही करण्यात आली
असता श्री विनय कौलवकर .वय २८ वर्षे यांनी तक्रारदार यांचा कडून २००००० रुपयांचा लाचेची रक्कम
स्वीकारली याच वरून त्यांचावर पोलीस स्टेशन गोंदिया शहर येथे आज १३/०४/२०१६ रोजी
लाच लुचपत प्रतिबंधक कायदा १९८८ अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. सदरची
कार्यवाही सन्माननीय श्री संजय दराडे
पोलीस उपायुक्त / पोलीस अधीक्षक लाच लुचपत विभाग नागपूर यांचा मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक श्रीमती
शुभांगी देशमुख , दीप्ती मोटघरे , श्री प्रभाकर बले , चालक संतोष मिश्रा व श्री शेखर देशकर लाच लुचपत विभाग भंडारा
यांनी केली.

Post a Comment