BREAKING NEWS

Wednesday, June 28, 2017

365 दिवस चालणारी वाशिम मधील जिल्हा परिषदेची शाळा 'हाऊसफुल्ल'

रिसोड :(रुपेश बाजड) \




राज्यात अनेक जिल्हा परिषद शाळांना  पटसंख्याअभावी उतरती कळा लागलेली आहे. मात्र, वाशिम जिल्ह्यातील नावली या गावातील जिल्हा परिषद शाळेबाहेर प्रवेश हाउसफुल्ल लिहण्याची वेळ आली आहे. या शाळेत आता एकही नवीन प्रवेश होऊ शकणार नाही. याच कारणही तसच आहे. ही शाळा वर्षातून 365 दिवस सुरु राहते.


जिल्हा परिषद शाळा आणि इतर शाळांना पटसंख्येअभावी उतरती कळा लागलेली आहे, हे आपना सर्वांना माहीतच आहे. या सर्वांचा परिणाम म्हणून शासनाने 2010 पासून शिक्षक भरतीसुद्धा बंद केली आणि काही शाळामधील शिक्षक अतिरिक्त ठरत आहेत.



वाशिम जिल्ह्यातील रिसोड तालुक्यामधील दोन हजार लोकसंख्या असलेल गाव नावली, या गावातील बहुतांश पालकांनी आपले पाल्य गावापासून 30 किलोमीटर रिसोड शहरात पाठवतात. कारण गावात असलेली जिल्हा परिषद शाळेत शिक्षक नव्हते. त्यामुळे लोकांनी आंदोलन करून शाळेत 5 शिक्षकांची नियुक्ती झाली आणि तेही हे पाच शिक्षक वर्गमित्र असल्याने त्यांनी जिल्हा परिषद शाळा कशी सुधरावयाची हे त्यांना प्रश्न होता. मात्र, या पाच शिक्षकांनी स्वताचा एक महिन्याचा पगार म्हणजे तब्बल दीड लाख रुपये जमा केले आणि गावातून सुद्धा 5 लाख रुपये गाववर्गणी करून शाळेला एक नव रूप दिले.
सुरुवातीला या शिक्षकांनी एकही सुट्टी न घेता 365 दिवस चालणारी वाशिम जिल्ह्यातील एकमेव शाळा केली. त्यानंतर याठिकाणी वेगवेगळ्या उपक्रमाद्वारे विद्यार्थ्यांना या ठिकाणी शिकवलं जातं.
विशेष म्हणजे शाळेमध्ये इन्व्हर्टरची व्यवस्था केली आणि दररोज सायंकाळी 7 ते 9 वाजता गावातील टीव्ही बंद कार्यक्रम शाळेच्या माध्यमातून गावात राबविला जातो. या काळात पालक आपल्या पाल्यांना घेवून याठिकाणी अभ्यास करून घेतात. अख्खी शाळा डिजिटल केली.
एका वर्षात या शाळेच रूप बदललं आणि तेही या पाच शिक्षकांमुळे. मागील वर्षी जून 2016 मध्ये या शाळेची पटसंख्या होती, ती 145 आणि यावर्षी पाहता पाहता जून 2017 पर्यंत येथील पटसंख्या ही तब्बल 415 पर्यंत गेली. त्यामुळे अखेर शाळेने हाउसफुलचा बोर्ड लावला. हे 415 विद्यार्थीपैकी अनेक विद्यार्थी रिसोड, मालेगाव, मेहकर, डोणगाव अशा ठिकाणी शिक्षण घेत होते. मात्र, हे सगळे विद्यार्थी आणि आजूबाजूच्या 10 गावातील विद्यार्थी या शाळेत शिकायला आले आहेत.
आज या नावली येथील जिल्हा परिषद शाळेत 1 ते 8 वीपर्यंत वर्ग आहे आणि शिक्षक केवळ सहा आहे. त्यामुळे याशाळेत शिक्षकांची खूप आवश्यकता आहे. या शाळेतील पाच शिक्षकांनी मिळून जे कायापालट केला त्याची स्तुती जितकी केली तितकी कमीच आहे.

Share this:

Post a Comment

सूचना

विदर्भ24न्यूज़ पोर्टल को बेहतर बनाने में सहायता करें और किसी खबर या अंश मे कोई गलती हो या सूचना / तथ्य में कोई कमी हो तो हमसे संपर्क करे - 9421719953

 
Copyright © 2014 Vidarbha Latest News विदर्भ24न्यूज Amravati Letest News. Template Designed by Vidarbha24news - या इंटरनेट न्यूज चॅनेल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही.