महेंद्र महाजन जैन / रिसोड
- जनशिक्षण संस्थान कार्यालयात २१ जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाला अध्यक्षस्थानी योग प्रशिक्षक गजानन इंगोले तर प्रमुख उपस्थितीमध्ये जनशिक्षण संस्थानचे संचालक भागवत पेदे सर, कार्यक्रम अधिकारी कुंडलीक भांदुर्गे हे उपस्थित होते. प्रथम विद्येची देवता माता सरस्वतीच्या प्रतिमेचे पुजन व हारार्पण करण्यात आले. प्रास्ताविकात भागवत पेदे यांनी योग दिनाचे महत्व पटवून दिले. योग प्रशिक्षक गजानन इंगोले यांनी योगासने, ताडासन, वृक्षासन, अर्धचक्रासन, कपालभारती इत्यादी आसनाचे प्रात्यक्षिक उपस्थितांना करुन दाखविले. व त्यांच्याकडून आसने करवुन घेतली. तसेच ध्यानाचे महत्व, एकाग्रता वाढवून आपल्या बुध्दीचा विकास कसा करता येईल हे सांगीतले. या कार्यक्रमाला जनशिक्षण संस्थानचे कर्मचारी, प्रशिक्षणार्थी उपस्थित होते. सुत्रसंचालन कैलास बोरकर यांनी तर आभार कडूभाऊ अंभोरे यांनी केले.
Post a Comment