जिल्हा प्रतिनिधी/ महेंद्र महाजन जैन
वाशिम : महात्मा बसवेश्वरांच्या क्रांतीकारी विचारांचा प्रसार व प्रचार करणारे कर्नाटकच्या बिदर जिल्हयातील भालकी येथील हिरेमठ संस्थानमध्ये येत्या 21 व 22 एप्रिल रोजी पुज्य डॉ. चेन्नबसव पट्टदेवरुंचा 18 वा स्मरणोत्सव आणि यानिमित्ताने महात्मा बसवण्णा वचनजत्रा कार्यक्रमाचे आयोजन चेन्नबसवाश्रमामध्ये करण्यात आले आहे.
त्यानिमित्ताने शुक्रवार, 21 एप्रिल रोजी भव्य मिरवणूक, उद्घाटन, चिंतन गोष्ट व सायंकाळी संास्कृतीक कार्यक्रम आणि शनिवार, 22 एप्रिल रोजी सामुहिक इष्टलिंग चिंतन, चिंतन गोष्ट, सामूहिक विवाह सोहळा आदी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. महात्मा बसवेश्वरांच्या क्रांतीकारी विचारांचा प्रसार व प्रचार करणारे भालकी येथील हिरेमठ संस्थान हे महाराष्ट्र, कर्नाटक व तेलंगणा या तीन राज्यातील प्रसिध्द असलेला मठ आहे. पुज्य डॉ. चेन्नबसव अप्पाजींनी महाराष्ट्र बसव परिषदेची स्थापना करुन महाराष्ट्रात बसवतत्व विचार जागोजागी पेरले. या परिषदेव्दारा शरणांचे विचार पोहोचविण्यासाठी 110 पुस्तके अनुवादीत करुन प्रकाशित केली आहेत. तसेच महाराष्ट्रातील 36 जिल्हयात बसवज्योती संदेश यात्रा काढून बसवतत्वांचा प्रसार करण्यात आला. म्हणूनच पुज्य अप्पाजी चेन्नबसव पट्टदेवरुंचा स्मरणोत्सव वचन जत्रा म्हणून साजरा होत आहे. या दोन दिवशीय कार्यक्रमात महाराष्ट्र व कर्नाटकातील मठाधिश, साहित्यीक, संशोधक, विचारवंत, समाजसेवक व राजकीय मान्यवरांचे मार्गदर्शन लाभणार आहे. तरी जिल्हयातील विरशैव समाजबांधवांनी या कार्यक्रमात जास्तीत जास्त संख्येने सहभागी होण्याचे आवाहन महाराष्ट्र बसव परिषदेचे जिल्हाध्यक्ष का.शि. लाव्हरे यांनी केले आहे.

Post a Comment