वरुड (अमरावती) -:
प्रभू श्रीराम नवमी जन्मोत्सवच्या शुभपर्वावर भारतीय जनता पार्टी कार्यालय वरुड येथे रामजन्मोत्सव मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी मोर्शी विधानसभा मतदार संघाचे आमदार डॉ.श्री.अनिलजी बोंडे व डॉ.सौ.वसुधाताई बोंडे यांनी श्रीरामाच्या प्रतिमेचे पुजन करून हारार्पण केले व सर्व नागरिकांच्या सुख-समृद्धी करिता प्रार्थना केली. प्रभू श्रीराम मर्यादा पुरुषोत्तम होते. देशाच्या संस्कृतीमध्ये त्यांचा आदर्श संपूर्ण जगाने घेतला आहे. श्रीरामाने मर्यादा पुरुषोत्तम म्हणून आम्हाला आदर्श जीवन दिले. त्यानुसार जीवनाकडे जाण्याचा संकल्प सर्वजण करतात. देशाला पुढे नेण्याचा संकल्प प्रधानमंत्री नरेंद्र मोदी व राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. हा संकल्प पूर्ण करण्यासाठी सर्वमिळून कटिबद्ध होवू या. व त्या जीवनाकडे जाण्याचा संकल्प सर्वांनी मिळून करु या. अशा मार्मिक शब्दात आमदार डॉ.अनिल बोंडे यांनी रामनवमीनिमित्त आयोजित कार्यक्रमाप्रसंगी मतदार संघातील संपूर्ण जनतेला रामजन्मोत्सवाच्या शुभेच्छा दिल्यात. यावेळी रामजन्मोत्सवाच्या कार्यक्रमाला शहरासह ग्रामीण भागातील भाजपा पदाधिकारी व प्रतिष्ठीत नागरिक व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.*
*प्रभू श्रीराम जन्मोत्सव संपूर्ण देशात मोठ्या उत्साहात साजरा होत असतो, आजच्या दिवशी राम जन्म तर आहेच, पण आज समर्थ रामदासांचा पण जन्म दिवस आहे. राम आणि रामदास या दोघांची जन्मवेळ सुद्धा एकच असल्या-कारणाने हा योग समजावा. त्यासोबतच आपल्या भारतीय संस्कृतीने अंगिकारलेल्या कौटुंबिक आणि सामाजिक जीवनाचा अत्युच्च आदर्श म्हणजे श्रीरामाचे जीवनचरित्र होय. त्याचे रामजन्मोत्सव दिनी साऱ्यांनीच स्मरण करावे. सार्वजनिक जीवनात वावरताना केवळ वैयक्तिक आणि भौतिक सुखाचा विचार न करता जनकल्याणासाठी कार्यरत राहण्यासाठी श्री राम यांच्याकडून निश्चित अशी प्रेरणा मिळते. लौकिकार्थाने आपल्या जीवनातील कर्तव्यांची पूर्तता करताना श्री रामांनी भारतीय समाजाला असत्याकडून सत्याकडे, अधर्माकडून धर्माकडे आणि अन्यायाकडून न्यायाकडे मार्गक्रमण करण्याची नेहमीच शिकवण दिली असल्याचे प्रतिपादन रामजन्मोत्सवाच्या कार्यक्रमातून मोर्शी विधानसभा मतदार संघातील भाजपाचे आमदार डॉ.अनिल बोंडे यांनी व्यक्त केले.*
*यावेळी मातोश्री त्रिवेणी बोंडे महिला सूतगिरणीच्या अध्यक्षा डॉ.वसुधाताई बोंडे, भाजपा तालुकाध्यक्ष देवेंद्र बोडखे, न.प. उपाध्यक्ष किशोर भगत, गटनेता नरेंद्र बेलसरे, नगरसेवक संतोष निमगरे, प्रितम अब्रुक, भारत खासबागे, नगरसेविका मंदाताई आगरकर, सौ.सुवर्णाताई तुमराम, विजय यावले, मारोती पवार, आशिष काकडे, गजुभाऊ ढोके, मनोज माहुलकर, मंगेश मुळे, संदीप कडू, रुपेश मदने, दीपक कडू, मनोहर कोसे, अजय देशमुख, दिनेश कोहळे, गौरधान बरवट, बाबुराव कंठक, अशोक निकम, सुरेश ढोके, प्रवीण सोनबर्से, साहेबराव ढोक यांच्यासह भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते

Post a Comment