BREAKING NEWS

Wednesday, April 5, 2017

*पिंपळखुटा संगम येथे 70 हजारांवर भाविकांनी घेतला महाप्रसादाचा लाभ*







जिल्हा प्रतिनिधी  / महेंद्र महाजन जैन
संत भायजी महाराज तिर्थक्षेत्र पिंपळखुटा संगम येथे रामनवमी उत्सवानिमित्त आयोजित १२६ व्या  यात्रा उत्सवात ७० हजारांपेक्षा अधिक भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. या यात्रा उत्सवात पंचक्रोशितील भाविकांची मांदियाळी होती.
मंगरुळपीर तालुक्यातील पिंपळखुटा संगम येथील अडाण व मडाण या नद्यांच्या संगमस्थळी असलेल्या संत भायजी   महाराज तिर्थक्षेत्रावर बुधवार  २९ मार्च ते  मंगळवार ११  एप्रिल दरम्यान १२६ व्या यात्रा उत्सवाचे आयोजन करण्यात आले. बुधवार  २९ मार्च  ते मंगळवार ४  एप्रिल  सकाळी ६ वाजे पर्यंत ‘राम कृष्ण विठ्ठल हरी नारायण’ नामाचा अखंड जयघोष झाला. तर मंगळवार ४ एप्रिल  रोजी सकाळी ६ वाजता काकड आरती , सकाळी ७.०० वाजता शोभायात्रा मिरवणूक ,सकाळी ८ वाजता  समाधी पूजन व आरती, सकाळी १० वाजता भजन संध्या कार्यक्रम,  दुपारी १२ वाजता परमपुज्य पद्माकर तर्हाळकार यांच्या सुमधुर वाणीतून श्रीराम जन्म कथा प्रवचन, दुपारी २ वाजता श्रीराम, लक्ष्मण व सिता मुर्तीचे पूजन, दुपारी ३ वाजता गोविंद महाराज प्रदक्षिणा व दहीहांडी कार्यक्रम उत्साहात पार पडला. त्यानंतर दुपारी ४ वाजता पासून भव्य महाप्रसादाचे वितरण करण्यात आले. दिवसभर मंदीर परिसरात भाविकांची मांदियाळी होती. सुरुवातीला शिस्तबध्द पध्दतीने महिलांना महाप्रसाद वितरीत करण्यात आला. त्यानंतर पुरुषांना  महाप्रसादाचे वाटप करण्यात आले रात्री उशीरापर्यंत महाप्रसादाचे वितरण सुरुच होते. विशेष म्हणजे ७० हजारापेक्षा अधिक भाविकांना पंगतीत बसवूनच महाप्रसाद देण्यात आला.महाप्रसाद तयार करणे व वितरणासाठी परिसरातील भाविक भक्तांनी मोठे सहकार्य केले. त्याचप्रमाणे  टँकरधारक व विविध भक्त मंडळांनी  भाविकांसाठी पाण्याची व इतर सुविधा उपलब्ध करुन दिली होती.
-----------–-----–-----–--- --------
* आजपासून ग्रंथ पारायण व भागवत सप्ताह*
बुधवार ५ एप्रिल ते मंगळवार ११ एप्रिल पर्यंत दररोज सकाळी ६ ते ७ वाजे पर्यंत ह.भ.प. पुंडलीक महाराज गावंडे व लक्ष्मण महाराज फुके चांभई यांच्या मार्गदर्शनाखाली काकड आरती, सकाळी ७ ते ९  व संध्याकाळी ७ ते ९ वाजता पर्यंत  ह.भ.प.प्रकाश महाराज यांच्या उपस्थितीत संत भायजी महाराज ग्रंथ पारायण, दुपारी ११ ते २ व ३ ते ५ वाजे पर्यंत  ह.भ.प.प्रकाश महाराज यांच्या सुमधुर वाणीतून श्रीमद कथा भागवत वाचन ,संध्याकाळी ६ ते ७ हरीपाठ होणार आहे. बुधवार ५ एप्रिल रोजी रात्री ९ ते ११ हभप भानुदास महाराज, गुरुवार ६ एप्रिल रोजी हभप विनायक महाराज पिंपळगांव गुंजाटे व सोमवार १० एप्रिल रोजी हभप प्रकाश महाराज यांचे  हरीकिर्तन होणार आहे. मंगळवार ११  एप्रिल रोजी हनुमान जयंती निमित्त सकाळी ६ वाजता मिरवणुक व सकाळी ११ वाजता महाप्रसाद कार्यक्रम होणार आहे.  तरी वरील कार्यक्रमाचा लाभ भाविकांनी घ्यावा असे आवाहन गावकरी मंडळी व यात्रा उत्सव समितीने केले आहे.

Share this:

Post a Comment

सूचना

विदर्भ24न्यूज़ पोर्टल को बेहतर बनाने में सहायता करें और किसी खबर या अंश मे कोई गलती हो या सूचना / तथ्य में कोई कमी हो तो हमसे संपर्क करे - 9421719953

 
Copyright © 2014 Vidarbha Latest News विदर्भ24न्यूज Amravati Letest News. Template Designed by Vidarbha24news - या इंटरनेट न्यूज चॅनेल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही.