जिल्हा प्रतिनिधी / महेंद्र महाजन जैन /-
मालेगाव तालुक्यातील मुंगळा येथे श्रीरामकथा ज्ञानयज्ञ व अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन श्री हनुमान मंदीर मुंगळा येथे करण्यात आले आहे. सदर सप्ताह कार्यक्रम 04 एप्रिल ते 11 एप्रिल 2017 पर्यंत राहणार असुन, या सप्ताहाचा पंचक्रोशीतील भाविकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. तसेच सप्ताह समाप्ती निमीत्त 11 एप्रिल रोजी भव्य महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले.
मालेगाव तालुक्यातील मुंगळा येथे पहिल्यांदाच श्री हनुमान जयंती निमित्त या सप्ताहाचे आयोजन गावकरी यांनी केले.या कार्यक्रमाचे संयोजक ह.भ.प.श्री रमेश महाराज डोंगरकिन्ही हे आहेत. श्रीरामकथा प्रवक्ते ह.भ.प.श्री संजय महाराज मोरे, कौसडी जि.परभणी, हे असुन या सप्ताहातील दैनंदिन कार्यक्रमांमध्ये सकाळी 4 ते 6 काकडा, सकाळी 9 ते 12 व दुपारी 2 ते 5 श्रीरामकथा, सायंकाळी 6 ते 7 हरिपाठ, रात्री 9 ते 11 हरिकीर्तन होणार आहे. दैनंदिन हरिकीर्तनामध्ये ह.भ.प. प्रल्हाद महाराज पवार, शिरपुर (जैन) ह.भ.प. गजानन महाराज पांचाळ, शहापुर जि.परभणी ह.भ.प. सदाशिव सरकटे गुरूजी, लोणार जि.बुलढाणा ह.भ.प. रतन महाराज, शिरसाळा ता.मालेगाव ह.भ.प. गोपाळ महाराज पिपळे, मेहकर ह.भ.प.भगवान महाराज, मरसुळ ता.वसमत ह.भ.प.अनंता महाराज कनवाळे, कळंमुला ता.उमरखेड तर ह.भ.प. अनंता महाराज कनवाळे, कळंमुला ता.उमरखेड यांचे काल्याचे किर्तन होणार आहे. या सप्ताहाची सांगता भव्य महाप्रसादाचे होणार असून, याचा लाभ घेण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.

Post a Comment