कोल्हापूर -

श्री शनिशिंगणापूर येथे श्री शनिदेवाच्या चौथर्यावर महिलांना प्रवेश मिळाल्यानंतर धर्मद्रोही भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांनी कथित विजयाचा जल्लोष करण्यासाठी आणि कोल्हापुरातील श्री अंबाबाईचे दर्शन घेण्यासाठी १३ एप्रिल या दिवशी मंदिराच्या गाभार्यात जाण्यासाठी पोलीस बंदोबस्तात केलेले आंदोलन हिंदुत्ववादी महिला आणि पुरुष यांच्या प्रखर विरोधामुळे फसला. आंदोलन केले. साडी घालूनच महिलांना गाभार्यात प्रवेश देण्याच्या श्री अंबाबाई देवस्थान समितीच्या अटीच्या विरोधात जाऊन देसाई यांचा सलवार-कुर्त्यामध्येच दर्शन घेण्याचा अट्टाहास होता; परंतु पोलिसांनी श्री अंबाबाई मंदिरापासून ४ कि.मी. अंतरावरच तृप्ती देसाई आणि त्यांच्या कह्यात घेतले होते; मात्र काही वेळाने तृप्ती देसाई २-३ महिला कार्यकर्त्यांसह पोलीस बंदोबस्तात पुन्हा मंदिरात दाखल झाल्या आणि त्यांनाी गाभार्यात जाण्याचा प्रयत्न केला. या वेळी हिंदुत्ववाद्यांनी केलेल्या प्रखर विरोधामुळे त्यांचा प्रयत्न फसला. या वेळी तृप्ती देसाई यांच्यावर शाईही फेकण्यात आली. आंदोलनाच्या वेळी महिला पोलीस कर्मचार्यांऐवजी पुरुष पोलीस कर्मचार्यांनी काही धर्माभिमानी महिलांना मंदिरातून बाहेर काढले. या अवमानाच्या विरोधात धर्माभिमानी महिलांनी या पुरुष पोलीस कर्मचार्यांच्या विरोधात तक्रार दाखल करणार असल्याचे सांगितले आहे. तृप्ती देसाई यांना विरोध करणार्या धर्माभिमान्यांना पोलिसांनी अडवण्याचा प्रयत्न केला; मात्र संतप्त झालेल्या धर्माभिमान्यांनी आमच्यावर काय कारवाई करायची ती करा, आम्ही मागे हटणार नाही, अशी चेतावणी दिली. श्री अंबाबाई मंदिराच्या परंपरांच्या रक्षणासाठी पुढील धर्माभिमानी सहभागी झाले होते : बजरंग दलाचे जिल्हाप्रमुख श्री. संभाजी साळुंखे, बजरंग दलाचे शहरप्रमुख श्री. महेश उरसाल, शिवसेना शहरप्रमुख श्री. शिवाजीराव जाधव, शिवसेना उप जिल्हाप्रमुख श्री. संभाजी भोकरे, भाजपचे श्री. रामभाऊ चव्हाण, श्री अंबाबाई देवस्थान शांतता समितीचे श्री. श्रीनिवास साळुंखे, बजरंग दलाचे सचिन मांगुरे आणि प्रशांत कागले, भाजपचे सुरेश जरक, टोल विरोधी कृती समितीच्या दीपा पाटील, बाबा पारटे, हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र राज्य संघटक श्री. सुनिल घनवट, समितीप्रणीत रणरागिणी शाखेच्या राज्य संघटक कु. प्रतिक्षा कोरगावकर, समितीचे श्री. शिवानंद स्वामी, सनातन संस्थेचे प्रसाद कुलकर्णी, धर्माभिमानी प्रमोद सावंत इत्यादी हिंदुत्ववादी.

Post a Comment