BREAKING NEWS

Thursday, April 14, 2016

अमरावती जिल्हा मध्यवर्ती कारागृहाच्या परिसरात आग

अमरावती /---

 

 स्थानिक मध्यवर्ती कारागृहाच्या परिसरात आज बुधवारी दुपारच्या सुमारास २ वाजता झाडाच्या फांदीला आग लागल्याने ही आग सर्वत्र पसरत गेल्यामुळे परिसरात मोठय़ा प्रमाणात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. अग्निशमक दलाच्या पथकाने घटनास्थळ गाळून आगीवर नियंत्रण मिळविल्यामुळे मोठी हानी टळली.
उन्हाचा पारा ४२ अंश सेल्सिअसच्या वर गेला असून, या वातावरणात आग लागणे ही साहजिकच बाब आहे. अमरावती मध्यवर्ती कारागृहाच्या अवतीभोवती असलेला संपूर्ण परिसर हा जंगलाचे व्याप्त असल्यामुळे दुपारी २ च्या सुमारास झाडाच्या कोरड्या फांदीने अचानक पेट घेतल्यामुळे त्या परिसरातील संपूर्ण झाडे आगीच्या लपेट्यांमध्ये आली. विशेष म्हणजे अग्निशमक दलाने आगीवर नियंत्रण मिळविल्यानंतर सुध्दा झाडाच्या फांदीवर आगीचा अंश अद्यापही शिल्लकच होता. झाडाच्या फांदीपासूनच गेलेले केबलचे वायर आगीच्या लपेट्यात आल्यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये भीती निर्माण झाली होती. मात्र अग्निशमन दलाने पुन्हा घटनास्थळावर दाखल होऊन जळत असलेली फांदी झाडाच्या वेगळी करून तिला लागलेली आग विझवली. या घटनेत मोठी जीवित तसेच वित्तहानी टळली आहे.

Amravati Letest News

Share this:

Post a Comment

सूचना

विदर्भ24न्यूज़ पोर्टल को बेहतर बनाने में सहायता करें और किसी खबर या अंश मे कोई गलती हो या सूचना / तथ्य में कोई कमी हो तो हमसे संपर्क करे - 9421719953

 
Copyright © 2014 Vidarbha Latest News विदर्भ24न्यूज Amravati Letest News. Template Designed by Vidarbha24news - या इंटरनेट न्यूज चॅनेल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही.