BREAKING NEWS

Saturday, April 16, 2016

कोढव्यातील युवकानी दिले कबूतराला जीवदान कड़क उन्हामुळे पशु -पक्षयांच्या जीवाची तगमग

● अनिल चौधरी * पुणे ●
http://www.vidarbha24news.com/

 सध्या राज्यात दुष्काळाची परिस्थिति आहे . त्यामुळे राज्याप्रमाने पुणे शहर जिल्ह्यामध्ये पाणी टंचाई निर्माण झाली असून कड़क उन्हामुळे पशु -पक्षयांच्या जीवाची तगमग होताना पहायला मिलत आहे . दुष्काळाचे नाव घेताच अंगावर काटा येतो सर्व सामान्य माणसाचे हाल तर होताच आहे या जगात पण या मुख प्राण्याचे देखील खूप हाल होत आहे . अशीच घटना कोंढवा भागातील वेताळ मंदिराच्या आवारात असणाऱ्या झाडाखाली घडली. वेताळ मित्र मंडळाचे खजिनदार सचिन चौधरी , कुणाल कामठे हे मंदिराच्या आवारात असणऱ्या झाडाखाली बसले होते . इटक्यात त्यांना एक कबूतर झाडाखाली तहानलेला आढळला .त्याला निट उड़ताही येत नव्हते . दुपारच्या प्रचंड उन्हामुळे त्याला फार त्रास होत होता.हे ह्या कार्यकर्त्यांच्या लक्षात येताच त्यांनी कपाच्या साह्याने त्याला पानी पाजले. पाणी पिल्यानंतर कबूतर लगेच उड़त गेले . यानंतर या सचिन चौधरी व कुणाल कामठे या युवकानी तिथे पाण्याच्या एका कुंडयाची व्यवस्था करून पानी भरून ते पात्र ठेवले आहे. पुणे शहरात दोन दिवसानी पानी पुरवठा होत असून नागरिकांनी थोड़े पानी आपल्या घराच्या छपरावर , इमारतीच्या टेरेसवर ठेवावे त्यामुळे पक्षाना तीव्र उन्हात पानी मिळेल व् त्यांची तहान भागेल असे आवाहन यांनी केले आहे

Share this:

Post a Comment

सूचना

विदर्भ24न्यूज़ पोर्टल को बेहतर बनाने में सहायता करें और किसी खबर या अंश मे कोई गलती हो या सूचना / तथ्य में कोई कमी हो तो हमसे संपर्क करे - 9421719953

 
Copyright © 2014 Vidarbha Latest News विदर्भ24न्यूज Amravati Letest News. Template Designed by Vidarbha24news - या इंटरनेट न्यूज चॅनेल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही.