BREAKING NEWS

Tuesday, April 12, 2016

महालक्ष्मी मंदिराच्या गाभार्‍यात ७ महिलांनी प्रवेश केला, अंनिस आणि कम्युनिस्ट पक्षाच्या महिलांचा सहभाग कोल्हापूरच्या जिल्हाधिकार्‍यांचा महिलांना पाठिंबा

कोल्हापूर - 

 




 शेकडो वर्षांची शास्रसंमत परंपरा खंडित करत ११ एप्रिल या दिवशी ७ महिलांनी कोल्हापूर येथील महालक्ष्मी मंदिराच्या गाभार्‍यात जाऊन देवीचे दर्शन घेतले. शनिशिंगणापूर आणि त्र्यंबकेश्‍वर मंदिराच्या पाठोपाठ महिलांना महालक्ष्मी मंदिराच्या गाभार्‍यात प्रवेश मिळावा, यासाठी कोल्हापुरातही आंदोलन चालू करण्यात आले होते. येथील अवनि या संस्थेच्या पदाधिकारी अनुराधा भोसले आणि भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई या आंदोलन करत आहेत. या पार्श्‍वभूमीवर जिल्हाधिकारी अमित सैनी यांनी मंदिरातील श्रीपूजक आणि पश्‍चिम महाराष्ट्र्र देवस्थान व्यवस्थापन समितीच्या पदाधिकार्‍यांसमवेत एक बैठक घेतली होती. महालक्ष्मी मंदिरातील गाभार्‍यात महिलांना प्रवेश देण्यासाठी प्रशासन सकारात्मक आहे, असे जिल्हाधिकारी अमित सैनी यांनी या वेळी पत्रकारांशी बोलतांना सांगितले. www.vidrbha24news.com Kolhapur News , Letest News , Vidarbha News , Maharashtra News , India News

Share this:

Post a Comment

सूचना

विदर्भ24न्यूज़ पोर्टल को बेहतर बनाने में सहायता करें और किसी खबर या अंश मे कोई गलती हो या सूचना / तथ्य में कोई कमी हो तो हमसे संपर्क करे - 9421719953

 
Copyright © 2014 Vidarbha Latest News विदर्भ24न्यूज Amravati Letest News. Template Designed by Vidarbha24news - या इंटरनेट न्यूज चॅनेल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही.