BREAKING NEWS

Sunday, April 10, 2016

मृत्युंजयेश्वर मंदिरात ' शिव' संकल्पनेवर आधारित नृत्याविष्कार

अनिल चौधरी
> पुणे, -
  http://www.vidarbha24news.com/ShowNews.aspx?id=2299
   देवदेवेश्वर संस्थान आणि स्नेहललित केंद्रातर्फे गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर कोथरूडमधील मृत्युंजयेश्वर मंदिरात सुरु झालेल्या संगीत मासिक सभेत शुक्रवारी स्नेहललित केंद्राच्या गुरु स्नेहल फाटक-कळमकर आणि त्यांच्या शिष्यांचा नृत्याविष्काराचा कार्यक्रम संपन्न झाला.
>          'शिव' या संकल्पनेवर आधारित भरतनाट्यम शैलीतून  सादर करण्यात आलेल्या या नृत्याविष्काराची संकल्पना आणि संरचना स्नेहल फाटक-कळमकर यांची होती. त्यांनी स्वत: आणि जान्हवी उभे, दीक्षा वायदंडे, विद्या भिडे, नेहा देशपांडे, पूजा खेडेकर, व सायली पवार या त्यांच्या शिष्यांनी विविध नृत्यप्रकारांच्या माध्यमातून  जीवाच्या उत्पत्तीपासून 'नार'  निर्मितीपर्यंत आणि शंकराच्या 'तांडवा' पासून पार्वतीच्या 'लास्या' पर्यंत 'शिवा'चे कथानक उलगडून दाखविले. संज्ञा फाटक-पंडित यांनी 'रंगभूषा' केली होती. मृत्युंजयेश्वर मंदिरात मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या रसिकांनी याचा आस्वाद घेतला. प्रारंभी स्नेहललित केंद्रातर्फे स्नेहल फाटक-कळमकर यांच्या हस्ते नगरसेवक पृथ्वीराज सुतार आणि 'आर्टीट्युड' संस्थेच्या स्मिता महाजन यांचा हृद्य सत्कार करण्यात आला.

Share this:

Post a Comment

सूचना

विदर्भ24न्यूज़ पोर्टल को बेहतर बनाने में सहायता करें और किसी खबर या अंश मे कोई गलती हो या सूचना / तथ्य में कोई कमी हो तो हमसे संपर्क करे - 9421719953

 
Copyright © 2014 Vidarbha Latest News विदर्भ24न्यूज Amravati Letest News. Template Designed by Vidarbha24news - या इंटरनेट न्यूज चॅनेल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही.