BREAKING NEWS

Thursday, April 28, 2016

केंद्र शाषण पुरस्कृत हिंदुस्तान पेट्रोलियम कार्पोरेशन च्या उपक्रमा अंतर्गत "धूर मुक्त गाव" या स्पर्धेतील पारितोषिकांचे वितरण थाटात संपन्न युवा उद्योजक भीमराव लिंगे व सौ. लिंगे यांना विदर्भातून प्रथम रणर-अप चा अवार्ड . "गरिबांना मोफत गैस कनेक्शन " प्रधानमंत्री "उज्वला " योजनेचा १ मे पासून प्रारंभ

चांदुर रेल्वे- (शहेजाद  खान)-/






 
        पेट्रोलियम आणि पाकृतिक गैस मंत्रालय द्वारा पुरस्कृत हिंदुस्तान पेट्रोलियम कार्पोरेशन च्या उपक्रमा अंतर्गत नागपूर येथील हॉटेल ली मैरेडीयन येथे नुकताच एका खास समारंभात “धूर मुक्त गाव" या स्पर्धेतील पारितोषिकांचे वितरण एचपीसीएल चे  के .एस .राव, सहायक मुख्य प्रबंधक (वेस्ट झोन), यांचे हस्ते  व श्री अमिताव धार ,मुख्य विभागीय व्यवस्थापक, श्री महेश राम, विभागीय व्यवस्थापक आणि श्री लोकेश सक्सेना उप व्यवस्थापक यांचे प्रमुख उपस्थितीत प्रदान करण्यात आला.  सदर ची  स्पर्धा संपूर्ण भारतामध्ये एलपीजी गैस वितरका मध्ये आपापल्या परिक्षेत्र मध्ये एक एक गाव निवडून शत प्रतिशत गाव / वार्ड हे धूर मुक्त म्हणजे एकही घरी पारंपारिक पद्धतीने लाकाडाचा, कोळशाचा अथवा शेन गोवऱ्या चा वापर न करता  उर्जा म्हणून एलपीजी गैस चा वापर करण्यावर आधरित होती.
         यामध्ये युवा उद्योजक व चांदुर रेल्वे येथील बीटीएल एच.पी. गैस एजन्सी चे संचालक भीमराव लिंगे यांनी विदर्भातील २३ गाव /वार्ड ची निवड करून अवघ्या ६ महिन्यामध्ये संपूर्ण गावातील १०० टक्के कुटुंबाना केंद्र सरकारच्या डीपोजीट फ्री गैस कनेक्शन या योजनेद्वारे घरोघरी जावून गैस जोडणी करून दिली व चुलीवरील स्वयंपाक बंद केला . चुलीतील धुरा मूळे कुटुंबातील महिला व मुलांच्या प्रकृतीवर घातक परिणाम होतात. १ दिवसच्या चुलीतील धुरा मूळे जवळपास  ४०० सिगरेट एवढा धूर निर्माण होवून त्याना श्वास घेणे ,टीबी ,फेपडे तसेच डोळ्यांचा आजार होत होता या गैस कनेक्शन च्या जोडणी मुळे महिलांना एक प्रकारचा सन्मान प्राप्त झाला आहे

          चांगले जीवन जगण्यासाठी स्वच्छ इंधन चा पुरवठा करून गाव धूर मुक्त करण्यासाठी चांदुर रेल्वे तालुक्यातील प्रत्येक गावामध्ये सर्वेक्षण करण्यात आले, ज्यांचे कडे कनेक्शन नाही अशा कुटुंबाना / बीपी एल धारकांना सरकारी योजनाची माहिती देण्यात आली, धुरा मुळे  होणारे आरोग्याचे नुकसान या बाबत समुपदेशन करण्यात आले या साठी प्रत्येक गावातील सरपंच व सचिव यांची मदत घेवून १०० टक्के गैस कनेक्शन चे वाटप झाल्यानंतर तसा ग्राम पंचायत मध्ये ठराव घेवून गाव धूर मुक्त झाल्याचे  गट विकास अधिकारी पंचायत समिती यांचे मार्फत घोषित करण्यात आले. अशा प्रकारे विदर्भातील सर्वात जास्त गाव धूर मुक्त करण्यात आले .

Share this:

Post a Comment

सूचना

विदर्भ24न्यूज़ पोर्टल को बेहतर बनाने में सहायता करें और किसी खबर या अंश मे कोई गलती हो या सूचना / तथ्य में कोई कमी हो तो हमसे संपर्क करे - 9421719953

 
Copyright © 2014 Vidarbha Latest News विदर्भ24न्यूज Amravati Letest News. Template Designed by Vidarbha24news - या इंटरनेट न्यूज चॅनेल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही.