चांदुर रेल्वे - शहेजाद खान /--- 
चांदूर रेल्वे तालुक्यात विहिरीमध्ये बसून एका अनोख्या उपोषणाला सोमवारपासून सुरवात झाली आहे. चांदूर रेल्वे नगरपरिषदेमध्ये घरकुल मध्ये मोठ्या प्रमाणात घोटाळा झाल्याचा आरोप असताना प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याने आरटीआय ऍक्टिव्हिस्ट गौतम जवंजाळ यांनी विहिरीत बसून उपोषणाला सुरवात केली आहे. चार दिसानंतरही कोणतीही कारवाई न केल्यामुळ गौतम जवंजाल यांच्या विहीर उपोषणाची तातडीने दाखल घ्यावी या आशयाचे निवेदन गुरूवारी भारतीय जनता पार्टीचे तालुका अध्यक्ष रविंद्र उपाध्ये व शहर अध्यक्ष प्रमोद नागमोते तसेच शिवसेनेचे गजु यादव यांच्या नेतृत्वात नायब तहसीलदार सूर्यवंशी यांना निवेदन देवुन आपला पाठिंबा जाहीर केला. यावेळी भाजपाचे तसेच शिवसेने चे कार्यकर्ते प्रामुख्याने उपस्थीत होते.

Post a Comment