चांदुर रेल्वे- (शहेजाद खान)-//

घरकुल घोटाळ्यातील दोषींवर पुरावे देवुन कारवाईसाठी गेल्या चार दिवसांपासुन सामाजिक कार्यकर्ते गौतम जवंजाळ यांचे विहिरीत उपोषण सुरू आहे. उपोषणकर्ते जवंजाळ यांची गुरूवारी सकाळीच प्रकृती खालावली मात्र प्रशासनाला अजुनही घाम सुटलेला नाही. अखेर मुख्याधिकारी गिता ठाकरे यांचा उपोषणस्थळी भेटीचा मुहुर्त निघाला व त्यांनी गुरूवारी उपोषणमंडपी भेट दिली व चौकशीविना गुन्हे दाखल करणार नसल्याचे मत व्यक्त केले. त्यामुळे जिल्हाधिकारी, मुख्याधिकारी उपोषणकर्त्याची फक्त थट्टाच करीत असुन उपोषणकर्त्याचा जिव गेल्यानंतर कारवाई करणार का असा संतप्त सवाल शहरवासीयांनी मुख्याधिकारी ठाकरे यांना केला आहे.
चांदूर रेल्वे नगरपालिकेत तत्कालीन काँग्रेस-राष्ट्रवादी सरकार असतानाच घरकुल घोटाळा झाल्याचे आरटीआय ऍक्टिव्हिस्ट गौतम जवंजाळ यांनी माहितीच्या अधिकारातून जनतेसमोर आणले होते. दरम्यानच्या काळात त्यांनी संबंधित अधिकारी नगरसेवकांवर गुन्हे दाखल करून कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली होती. मात्र, शासनस्तरावर या प्रकरणाचा चौकशी अहवाल जिल्हाधिकारी किरण गित्ते यांच्याकडे सादर झाला असतानाही राजकीय दबावाला बळी पडून कारवाई होत नसल्याचा आरोप गौतम जवंजाळ यांचा आहे. चांदूर रेल्वे न.प. अंतर्गत येत असलेल्या उर्दु शाळेजवळील एका काँग्रेसच्या नगरसेविकेचे पती यांनी त्यांच्या लेआऊटमधील सार्वजविक विहीर बुजवली होती. मात्र एकीकडे पाण्याचा दुष्काळ असताना विहीर बंद करण्याचा घाट गौतम जवंजाळ यांनी उखडून लावला होता आणि हीच ती विहीर आहे, त्याच विहिरीत गौतम जवंजाळ यांनी नगरपालिकेत सुरु असलेल्या भ्रष्टाचारासंदर्भात गुन्हे दाखल करून कायदेशीर कारवाई करण्याच्या मागणीसाठी विहिरीत उपोषणाला बसले आहे. प्रशासन उपोषण सोडण्यास जवंजाळांवर दबाव टाकुन 30 एप्रीलपर्यंत कारवाईचे आश्वासन दिले असता एफआयआर प्रत भेटल्याशिवाय बाहेर निघणार नसल्याचे जवंजाळ यांनी ठामपणे सांगितले. उपोषणाला चार दिवस झाले असता शुक्रवारी जवंजाळ यांची प्रकृती खालावली आहे. मात्र निगरगठ्ठ प्रशासन अजुनही झोपेचेच सोंग करीत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. तसेच मुख्याधिकाऱ्यांच्या कारवाई प्रक्रीयेवर संशय व्यक्त होत आहे.
मुंबईवारीतच जास्त खुष असलेल्या मुख्याधिकारी गिता ठाकरे यांचा उपोषणस्थळी भेटीचा मुहुर्त चक्क चवथ्या दिवशी निघाला. त्यांनी गुरूवारी उपोषणस्थळी भेट दिली व पुन्हा चौकशी करून कारवाई करणार असल्याचे सांगितले. त्यामुळे उपोषणकर्त्याचा जिव गेल्यानंतर कारवाई करणार का ? असा संतप्त सवाल काही शहरवासीयांनी मुख्याधिकारी यांना केला आहे.
मुख्याधिकारी यांची कारवाई प्रक्रीया संशयाच्या भोवऱ्यात ? -
मुख्याधिकारी ठाकरे यांची घरकुल घोटाळ्यातील दोषींवर करीत असलेली कारवाई प्रक्रीया संशयाच्या भोवऱ्यात असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. कारण पहिलेच चौकशीला १० दिवसाच्या ऐवजी ९० दिवस लागल्यांनतरही पुन्हा चौकशी करावी लागणार असल्याचे ठाकरे यांनी सांगितले. त्यातच उपोषणकर्त्याची प्रकृती खालावली आहे. मात्र त्याचे मुख्याधिकारी याना घेणे- देणे नसल्याचे दिसुन येत आहे.
दोषींना वाचविण्याचा होत आहे प्रयत्न ? -
मुख्याधिकारी ठाकरे ह्या बुधवारी रात्री दोन- तीन वेळा पोलीस स्टेशनमध्ये गेल्या. एसडीओ यांनीही बुधवारीच कारवाईचे आश्वासनही दिले. मात्र दुसऱ्या दिवशी गुरूवारी मुख्याधिकारी यांनी उपोषणस्थळी येवुन पुन्हा चौकशी करणार असल्याचे सांगितले. त्यामुळे एकाच रात्री घडले तरी काय ? किंवा प्रशासन कोणाच्या दबावाखाली आहे हे अद्यापही समजले नाही. त्यामुळे या घरकुल महाघोटाळ्यातील दोषींना वाचविण्याचा प्रयत्न तर नाही होत आहे ना ? हे समजने कठीन झाले आहे

अखेर मुख्याधिकाऱ्यांचा भेटीचा निघाला मुहुर्त, दिली उपोषणस्थळी भेट-

Post a Comment