अनिल चौधरी,
/
पुणे
--
(अमोल मराठे , महाड यांसकडून)
-
मुंबईहून महाड कडे जाणाऱ्या रस्त्यावर दुपारी दोनच्या सुमारास दुचाकी क्रं. MH 06 BB 5371 या दुचाकीवरील दोन व्यक्तींचा दुचाकी स्लिप झाल्यामुळे अपघात घडून एक व्यक्ति ठार तर एक जण जखमी झाला आहे.
याबाबत महामार्ग सहाय्यक पोलीस निरीक्षक ठाकूर यांनी दिलेल्या माहितीनुसार , दोन च्या सुमारास दुचाकीवर दोन व्यक्तींचा अपघात झाल्याची माहिती स्थानिक नागरिकांनी आम्हाला दूरध्वनी द्वारे दिली . घटनेची माहिती समजताच माझ्या मार्गदर्शनाखाली पो. ह. श्री. घासे, नांदगावकर, गोरड व पो. नाईक म्हात्रे यांना सुचना करून अपघात ग्रस्तांसाठी प्रथम रुग्नवाहिकेची सोय करुण घटनास्थळी रुग्नवाहिका घेऊन अपघात ग्रस्तांना प्रथम रुग्णालयात दाखल केले. परंतु अपघात ग्रस्त विकी तानाजी शिंदे, वय 30, रा. गंधार पाले हां गंभीर जखमी असल्यामुळे त्याला तातडीने पुढील उपचारासाठी मुंबई येथे पाठवले असता परंतु वाटेतच केम्बुर्ली येथे त्याचा मृत्यू झाला. सचिन रवी पिंगळे वय 23 याला गंभीर मार लागला असून महाड येथे सरकारी इस्पितळात त्यावर उपचार चालू आहेत.
याप्रसंगी बोलताना महामार्ग पोलिस निरीक्षक ठाकुर म्हणाले की, वाहनचालकांनी वाहन चालविताना वाहतुकीच्या नियमांचे पालन करावे. वाहन चालक वाहन पुढे तसेच ओहरटेक करण्याच्या नादामध्ये वारंवार अपघात घडत आहे. नागरिकांनी व्यवस्थित व काळजीपूर्वक तसेच वाहतुकीचे नियम पाळले तर अपघातांचे प्रमाण फार कमी होईल .
महामार्ग पोलिस व महाड़ पोलिस स्टेशन चे कर्मचारी अपघात घडल्यास प्रथम त्वरित अपघात ग्रस्तांना रुग्णालयात दाखल करत आहे यामुळे अनेक नागरिकांचे प्राण वाचले आहेत. पोलिस नागरिकांना अतिशय चांगले सहकार्य करत असल्यामुळे महामार्ग पोलिस व महाड़ पोलिस स्टेशनचे कर्मचारी यांचे कौतुक होत आहे.
महाड शहर पोलीस स्टेशन मध्ये अपघाताचा गुन्हा र. नं. 45 / 2016 असा नोंद झाला असून पोलिस हवालदार कदम हे पुढील तपास करीत आहेत.
Post a Comment