प्रवीण गोंगले /----चंद्रपूर /---
चंद्रपूर जिल्ह्यात पकडण्यात आलेली वाघाची कातडी हैद्राबाद च्या नवाबांच्या महालातून चोरण्यात आल्या
चंद्रपूर जिल्ह्यातल्या गोंडपिंपरी तालुक्यात काही दिवस आधी पकडण्यात आलेली वाघाची कातडी ही हैद्राबाद च्या नवाबांच्या महालातून चोरण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. नवाब प्रिंस बहादूर असं या नवाबाचं नाव असून त्यांचा हैद्राबाद च्या बंजारा हिल्स मध्ये ३ एकरात भव्य महाल आहे. मात्र सध्या हे नवाब प्रिंस बहादूर इंग्लंड मध्ये राहत असल्यामुळे एका सुरक्षा एजेन्सीवर त्यांच्या महालाच्या सुरक्षेची भिस्त आहे. याच सुरक्षा एजेन्सी मध्ये काम करणा-या श्रीकांत या गार्ड ने दामोदर दुमल च्या मदतीने ही वाघाची कातडी चोरली आणि विकण्यासाठी चंद्रपूरला पाठवली. मात्र आरोपी ही कातडी विकण्याच्या प्रयत्नात असतांनाच पोलिसांनी गोंडपिपरी तालुक्यात वाघाच्या कातडीसह ४ आरोपींना अटक केली. धक्कादायक म्हणजे महालातील वाघाची कातडी चोरी गेल्याची कुठेही तक्रार नोंदविण्यात आलेली नाही. अतिशय चांगल्या अवस्थेत असलेल्या वाघाच्या या कातडीची किंमत अंदाजे ४० ते ५० लाख असल्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. चंद्रपूर वनविभागाने हैद्राबाद येथून दामोदर दुमल ला अटक केली असून त्याचा साथीदार श्रीकांत सध्या फरार आहे..
.....
Post a Comment