/-
कर्जत - जयेश जाधव /--
कर्जत तालुक्यातील अवसरे येथे जिल्हा स्तरावरील कबड्डी स्पर्धा सातत्याने आयोजित केल्याबद्दल स्पर्धा आयोजक यांच्या कार्याची दखल रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशनने घेतली आहे.या स्पर्धा आयोजित करणारे क्रांतीवीर भगत मास्तर
प्रतिष्टान चे अध्यक्ष भरत भगत यांना जिल्हास्तरीय उत्कृस्ट स्पर्धा आयोजक आणि संघटक हा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
स्वतंत्रसैनिक राघो भगत तथा भगत मास्तर आणि सीताबाई राघो भगत यांच्या स्मरणार्थ नेरळ जवळील अवसरे येथे क्रांतीवीर भगत मास्तर प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षी आदिवासी खुला गट, कर्जत तालुका मर्यादित महिला आणि पुरुष तसेच जिल्हास्तरीय पुरुष आणि महिला यांच्या कबड्डी स्पर्धा जिल्हा कबड्डी असोसिएशन आणि कर्जत तालुका कबड्डी असोसिएशन यांच्या मान्यतेने आयोजित करीत असतात. गेली अनेक वर्षे या कबड्डी स्पर्धा आयोजित केल्या जात आहेत. त्या स्पर्धा आयोजित करतांना स्पर्धेचे मुख्य आयोजक भरत भगत यांनी खेळाडू आणि कबड्डी खेळास प्रोत्साहन देण्याचा केलेला प्रयत्न याचा गौरव जिल्हा कबड्डी असोसिएशनने केला आहे. प्रेक्षकांना बसण्यासाठी गॅलरी तसेच आंतरराष्ट्रीय स्पर्धा यांच्या सारखे आयोजन करण्याचा प्रयत्न सतत केला आहे. दुसरी कडे एक वर्षी तर त्यांनी राज्य स्तरीय हौशी निमंत्रित कबड्डी खेळाडू यांची स्पर्धा देखील भरविली होती. त्या सर्व स्पर्धा यशस्वी करणारं म्हणून कबड्डी क्षेत्रात भरत भगत यांनी आपला ठसा उमटविला आहे.
त्याची दखल म्हणून रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या वतीने जिल्हा प्रीमियर लीग स्पर्धा सध्या पेण तालुक्यातील बांधाण येथे भरविली आहे.त्या स्पर्धेच्या निमित्ताने जिल्हा असोसिएशन च्या वतीने देण्यात येणारे पुरस्कार यांचे वितरण करण्यात आले. जिल्हा स्तरीय कबड्डी स्पर्धा संयोजक आणि संघटक हा मनाचा पुरस्कार कर्जत येथील भरत भगत यांना देण्यात आला. त्याबद्दल कर्जत तालुका कबड्डी असोसिएशन चे अध्यक्ष संतोष भोईर तसेच अन्य पदाधिकारी यांनी अभिनंदन केले आहे.
◆◆●●
फोटो ओळ
जिल्हा कबड्डी प्रीमियर लीग मधील आपल्या संघासोबत भरत भगत ◆●◆●
Post a Comment