BREAKING NEWS

Friday, May 6, 2016

उज्जैन सिंहस्थस्थळी वादळी पावसामुळे अनेक मांडव कोसळून १ साधू आणि ५ भाविक यांचा मृत्यू


  • सिंहस्थ प्रशासनाने वादळ आणि पाऊस यांच्या दृष्टीने काहीच काळजी घेतली नसल्याचे उघड ! 
     
     
     
     
     उज्जैन - ५ मेच्या दुपारी ४.३० वाजता अकस्मात झालेल्या जोरदार वादळी पावसामुळे येथील मंगलनाथ भागात असलेल्या सिंहस्थ मेळा क्षेत्राची मोठ्या प्रमाणात हानी झाली. यात एक साधू आणि ४ भाविक मृत्यूमुखी पडले, तर १३५ हून अधिक भाविक घायाळ झाले. एक घंट्याहून अधिक वेळ झालेल्या पावसात साधु-संतांचे अनेक तंबू कोसळले.जूना आखाड्याचे आंतरराष्ट्रीय संरक्षक महंत हरिगिरीजी आणि आखाडाप्रमुख महंत नरेंद्रगिरीजी महाराज यांनी या घटनेविषयी दु:ख व्यक्त केले आहे.
    उज्जैनचे पालकमंत्री भूपेंद्र सिंह यांनी या घटनेविषयी म्हटले आहे की, वादळात पडलेले तंबू साधू-संतांनी बनवले होते. सिंहस्थ प्रशासनाने प्रत्येक तंबूचे परीक्षण केले होते; परंतु आता आम्ही तंबूंची पुन: एकदा तपासणी करणार आहोत.ही घटना चांडाळ योगामुळे झाली असावी, अशी प्रतिक्रिया काही साधू-संतांनी व्यक्त केली आहे.

Share this:

Post a Comment

सूचना

विदर्भ24न्यूज़ पोर्टल को बेहतर बनाने में सहायता करें और किसी खबर या अंश मे कोई गलती हो या सूचना / तथ्य में कोई कमी हो तो हमसे संपर्क करे - 9421719953

 
Copyright © 2014 Vidarbha Latest News विदर्भ24न्यूज Amravati Letest News. Template Designed by Vidarbha24news - या इंटरनेट न्यूज चॅनेल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही.