उज्जैन -
येथील सिंहस्थपर्वात अचानक आलेले वादळ आणि मुसळधार पाऊस यांमुळे सहभागी आखाडे, संप्रदाय आणि आध्यात्मिक संस्था यांचा मांडव पडून मोठ्या प्रमाणात हानी झाली आहे. काही आखाड्यांचे मांडव जमीनदोस्त झाले आहेत. सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांनी धर्मप्रसारासाठी उभारलेल्या प्रदर्शनालाही या मुसळधार पावसाची झळ पोचली आहे; मात्र तुलनेत अल्प प्रमाणात हानी झाली आहे.
या मुसळधार पावसामुळे प्रदर्शनाच्या मंडपातील काही ठिकाणी चिखल झाला आहे. काही गृहोपयोगी साहित्य भिजले आहे. ज्याप्रमाणे गोवर्धन पर्वंत भगवान श्रीकृष्णाने करंगळीवर उचलल्यावर गोप-गोपींनी काठ्या लावल्या होत्या, त्याप्रमाणे या जोरदार पावसामुळे प्रदर्शनाला हानी पोहोचू नये, यासाठी साधकांनी प्रदर्शनाच्या मंडपाला आधार दिला होता. मुसळधार पाऊस पडत असतांना कुणीही साधक घाबरले नव्हते. सर्व साधक ॐ निसर्ग देवो भव, ॐ वेदं प्रमाणम्, हरि ॐ जयमे जयम्, जय गुरुदेव, हा नामजप करत होते आणि बचावकार्य कसे करता येईल, या दृष्टीने प्रयत्न करत होते. त्या वेळी ग्रंथांचा साठा असलेल्या खोलीतील पाणी बाहेर काढण्यासाठी आणि बाहेरील पाणी आत येऊ नये यासाठी साधकांनी मंडपाच्या बाहेर लहान नाले बनवले. या वेळी फ्लेक्सचे फलक पडले; मात्र मंडप पडला नाही. पाऊस येण्याच्या अर्धा घंटा आधीच साधकांनी ग्रंथ आणि इतर साहित्य झाकून ठेवले होते. त्यामुळे मोठी हानी झाली नाही. इतर संस्था, आखाडे यांचे मंडप, तंबू यांच्यामध्ये पाणी शिरून त्यांची मोठी हानी झाली आहे. एका संतांचा मंडप पूर्णपणे कोसळला आहे; मात्र त्यांच्याच बाजूला असलेल्या सनातनच्या प्रदर्शनाला मात्र कुठलीच झळ पोचली नाही. सनातन संस्थेच्या प्रदर्शनाच्या शेजारी असलेल्या अन्य एका संस्थेचा मंडप पूर्णपणे कोसळला आहे. सनातन आणि हिंदु जनजागृती समिती यांच्याकडून एका मोठ्या प्रदर्शनासह इतरत्र दोन लहान प्रदर्शनेही लावण्यात आली होती. या दोन लहान प्रदर्शनांची कोणतीही हानी झाली नाही.

Post a Comment