चांदूर रेल्वे / शहेजाद खान /---
मागील महिण्यातील ५ एप्रिल रोजी बागापुर गट ग्रामपंचायत सरपंचा सौ.आश्विनी प्रफुल स्थुल यांच्या विरूध्द अविश्वास ठराव बहुमताने पारीत झाला. सरपंचानी व्यथीत होऊन ११ एप्रिल रोजी जिल्हाधिकारीकडे अपिल दाखल केली. त्यावर अप्पर जिल्हाधिकारी यांनी ११ मे रोजी महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम प्रफुल स्थुल यांना कायम ठेवले.
बागापुर सात सदस्यीय गट ग्रामपंचायत आहे. ५ एप्रिल रोजी बागापुर गट ग्रामपंचायतच्या सहा सदस्यांनी सरपंचा अश्विनी स्थुल यांच्या विरूध्द अविश्वास ठराव बहुमतांनी पारीत केला. त्यामुळे व्यथीत झालेल्या सरपंचा अश्विनी स्थुल यांनी जिल्हाधिकारी याकडे अपिल सादर केली.अप्पर जिल्हाधिकारी यांनी यावर प्रकरणी दोन्ही पक्षाचे मत ऐकुन महाराष्ट्र ग्रा.पं.अधिनियम १९५८ ३५ (२) नुसार कारवाई न केल्यामूळे सभा बेकायदेशीर ठरवून अविश्वास ठराव रद्द करून सरपंच अश्विनी स्थुल यांना कायम ठेवले. सरपंचपदी अश्विनी स्थुल कायम झाल्यामूळ बागापुर, सांगुलवाडा, वाई, इस्माईलपुर येथील सर्वपक्षीय दलित बांधवामध्ये आनंदाचे वातावरण आहे. सरपंचा अश्विनी स्थुल यांच्या वतीने अॅड.धर्मेंद्र गोवर्धन चौधरी (बागापुर) यांनी बाजु मांडली. तर विरोधकातर्पेâ अॅड.अरूण गावंडे यांनी बाजु मांडली. शुक्रवारी अश्विनी स्थुल यांनी सरपंचपदाचा कार्यभार स्विकारला.
Post a Comment