शेगाव (मनोजकुमार वर्मा)/--
महाराष्ट्र राज्याचे बांधकाम, पणन व सहकार मंत्री चंद्रकात पाटील यांचा दौरा दि. 15 मे रोजी शेगांवात असल्याने खितपत पडलेला सार्वजनिक बांधकाम विभाग मोठया शिताफीने कामाला लागल्याचे चित्र दिसून येत आहे. शेगांव विकास आराखडा सा.बा.विभागामार्फत राबविल्या जात आहे. आणि आराखडयाच्या खोळंब्याबद्दल सर्वच राजकीय पक्षांनी आराखड्याविरुध्द आंदोलन केले असल्याने त्यातल्या त्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने करण्यात आलेल्या नागिन डान्सने आराखडा महाराष्ट्रातच नव्हे तर संपुर्ण देशभर गाजल्याने आराखड्याची उजळणी चंद्रकांत पाटील करु शकतात. कोणत्याही गोष्टीच्या तळाशी जावून बारीक सारीक बारकावे आणि समस्या लगेच निकाली काढण्याची चंद्रकांत पाटलांची कार्यशैली आहे. असे बोलल्या जाते. त्यामुळे सा.बा.वि. कामाला लागला असावा आणि भाजपाचे कार्यकर्ते चंद्रकांत पाटलांना गावात फिरवुन आराखड्याची पोल खोल करण्याची रणनिती आखु शकतात. त्यामुळेच चंद्रकांत पाटल्यांच्या दौर्याकडे सर्व शेगांव वासियांचे लक्ष लागले आहे. एवढे मात्र खरे.

Post a Comment