प्रमोद नैकेले/--
अचलपूर:-
महाराष्ट्र शासनाने एजंटवीरहीत वाहनचालक परवाना देण्याची पध्दत अंमलात आणून बरेच दिवस झाले मात्र आजही एजंटशीवाय परवाना मीळत नाही हे दूर्भाग्य.
अचलपूर विश्राम भवनावर महीण्यातून दोन वेळा वाहनचालक परवाना देण्याचा कॅम्प असतो येथे एजंट वीरहीत सरळ वाहनधारकाने आपले कागदपत्र जमा करून नाममात्र शुल्क भरून परवाना मीळण्याचे आदेश शासनाचे आहेत परंतु येथील आरटीओ अधिका-यांनी हे नियम धाब्यावर बसवून काही ठरावीक एजंटस् ला हाताशी घेवून गोरख धंदा सुरूच ठेवला आहे.परवाना मीळवण्याकरीता आवश्यक फार्म मोफत मीळतात पण ते एजंटकडेच प्राप्त होत असल्याने थोडया रूपयात परवाना मीळण्याऐवजी पाचसे ते सहासे रूपये आजही वाहनधारकांना मोजावे लागतात.एजंटमार्फत येणा-या वाहनधारकाची वाहनचालवण्याची चाचणी न घेता चक्क अर्धवट ज्ञान असणा-यांना परवाने देण्यात येत आहे त्यामुळे अपघातात वाढ होत आहे शिवाय दुचाकी सोबत चारचाकी वाहन चालवण्याचा परवाना मोफत ही सुध्दा पध्दत येथे आहे ज्यांना आवश्यक आहे व गरीब आहेत त्यांना खर्च परवडत नसल्याने त्यांना परवाने मीळणे आजही अशक्य आहे तसेच पहील्या कॅम्प वर शिकाऊ व तीस-या कॅम्पवर कायम परवाना हे प्रताप आजही अचलपूर विश्रामभवनात होत असलेल्या परवाना वीतरण केंद्रावर सुरू आहेत तरी वरीष्ठांनी याकडे त्वरीत लक्ष दयावे अशी जनतेतर्फे समाजसेवक किशोर भीडे यांनी मागणी केली आहे.
Post a Comment