BREAKING NEWS

Monday, May 30, 2016

कोकण रेल्वेमार्गावर गाड्यांचे वेळापत्रक कोलमडल्याने प्रवाशांचे हाल

खेड /  Ratnagiri News/----       -                                                                                                                                                                                   कोकण रेल्वे मार्गावरून धावणार्‍या रेल्वे गाडयांचे वेळापत्रक रविवारीही कोलमडल्याने प्रवाशांचे चांगलेच हाल झाले. ३ तास विलंबाने धावणार्‍या रेल्वे गाडयांमुळे प्रवाशांना पुन्हा एकदा मनस्तापालाच सामोरे जावे लागल्याने असंख्य प्रवाशांनी संताप व्यक्त केला. मांडवी एक्सप्रेस दुसऱया दिवशीही तब्बल ३ तास विलंबानेच धावत होती. कोकण रेल्वे गाडयांच्या विस्कळीत वेळापत्रकामुळे प्रवाशांनी खासगी वाहनांचा आधार घेणे पसंत केले.
                  शनिवारी तब्बल ७ विलंबाने धावणारी मांडवी एक्सप्रेस दुसऱया दिवशीही ३ तास विलंबानेच धावत होती. कुर्ला-कसाईवाडा येथे गर्डर्स उभारण्याचे काम हाती घेण्यात आल्याने मांडवी एक्सप्रेसच्या वेळापत्रकात रविवारी बदल करण्यात आला. सीएसटीवरून सकाळी ७.१० वाजता सुटणारी मांडवी एक्सप्रेस रविवारी सकाळी ९.१० वाजता सोडण्यात आली. याचमुळे कोकण मार्गावर मांडवी एक्सप्रेसचे वेळापत्रक बिघडलेलेच होते. मात्र, याबाबत प्रवाशांना कुठलीच कल्पना नसल्याने मांडवीचे प्रवाशी तासन्‌तास स्थानकातच तिष्ठतच बसले होते.
                   गावी आलेल्या चाकरमान्यांनी परतीची वाट धरण्यास सुरूवात केली असून याचमुळे सर्वच रेल्वे गाडयांना अलोट गर्दी उसळली आहे. मात्र, रविवारी रेल्वे गाडयांचे वेळापत्रक पुन्हा कोलमडल्याने प्रवाशांचे चांगलेच हाल झाले. रत्नागिरी-दादर पॅसेंजर एक तास उशिरानेच धावल्याने प्रवाशांच्या मनस्तापात भर पडली. नेत्रावती ४० मिनिटे, मडगावला जाणारी डबलडेकर १ तास, दिवा-सावंतवाडी दीड तास विलंबानेच धावत होती. जनशताब्दी व राजधानी एक्सप्रेस रविवारी निर्धारित वेळेत धावल्याने विशेषतः पर्यटकांना दिलासाच मिळाला.

Share this:

Post a Comment

सूचना

विदर्भ24न्यूज़ पोर्टल को बेहतर बनाने में सहायता करें और किसी खबर या अंश मे कोई गलती हो या सूचना / तथ्य में कोई कमी हो तो हमसे संपर्क करे - 9421719953

 
Copyright © 2014 Vidarbha Latest News विदर्भ24न्यूज Amravati Letest News. Template Designed by Vidarbha24news - या इंटरनेट न्यूज चॅनेल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही.