BREAKING NEWS

Sunday, May 15, 2016

हल्ले खोरांना विरुद्ध कठोर शासन करा , पञकार संरक्षण समितीची मागणी - विनोद पञे . "पत्रकार संरक्षण कायदा त्वरित लागू करा" :- अनिल चौधरी

◆●/-
अनिल चौधरी,
पुणे :-
/-◆●
पत्रकारांवर वाढत्या हल्ल्यांच्या विरोधात महाराष्ट्रातील सर्वच संघटनानी निषेध व्यक्त केला असून हल्लेखोरांविरोधात कठोर शासन करा , तसेच पत्रकार संरक्षण  कायदा त्वरित लागू करण्याची मागणी पञकार संरक्षण समितीचे अध्यक्ष  विनोद पञे  व राज्य प्रसिद्ध प्रमुख अनिल चौधरी यांनी केली आहे.
लोकशाही स्तंभ म्हणजे पञकार मग तो कुठल्याही वृत्तपञांचा किंवा माध्यमांचा संपादक , मालक किंवा प्रतिनिधी पत्रकारितेचे काम करीत असतांना शासनाच्याच नव्हे तर सामान्य नागरीकांच्याही हिताच्या बातम्यासाठी  समाजाची बांधिलकी म्हणून दररोज घडणाऱ्या घटना सामाजिक - राजकीय कार्यक्रमांच्या बातम्यांसाठी पञकार  सातत्याने वार्ता संकलनासाठी फिरावे लागते त्याच बरोबर समाजातील अनिष्ठ प्रथा रुडी परंपरा यांच्यासह भ्रष्टाचार,  अन्याय,  अत्याचार,  विरुद्ध आवाज उठविण्याचे धाडस करून सत्यता महाराष्ट्रातील जनतेपुढे  आणण्याचे अवघड काम नेहमी पत्रकारलाच  करावे लागते.
हि सर्व कामे करीत असतांना त्यांच्यावर काही संकट आल्यास त्यांच्या मदतीला धावून येणाऱ्यांची संख्या मात्र नांममात्रच अशी असते व शासनानेही पत्रकारांच्या हिताचे पाऊल अद्याप  टाकलेले नाही कधी टाकेल हेही सांगता येत नाही.
जोखिमचे कर्तव्य पार पडणाऱ्या पत्रकारांना संरक्षण देणारा कायदा ( पञकार संरक्षण कायदा ) करायला शासन अद्यापही  तयार नाही.
अशा कठीण परिस्थितीत महाराष्ट्रातील समस्त  पत्रकारांनी व पञकार संघटनानी एकसंघ होऊन आवाज पुकारने हि काळाची गरज आहे.  पत्रकारांच्या तसेच पत्रकारांवर हल्ला करणाऱ्या वाळूमाफिया व गुंडप्रवृत्तीचा काही लोकांनी दोनदिवसां पुर्वी दैनिक पुढारी वृत्तपञाचे प्रतिनिधी भारत शेंडगे कालठण ( ता. इंदापुर जि. पुणे ) हल्ला केला असुन तीव्र निषेध पत्रकारांवर हल्ला करणाऱ्या वाळूमाफियासह इतर गुंडप्रवृत्तीला तातडीने लगाम लाऊन त्यांच्यावर कठोर कारवाई करावी जेणेकरुन पुन्ह पञकारावर हल्ला करण्याच्या आधी हल्ले खोरांना शंभरवेळा विचार करावा लागेल .
याबाबत आपण लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच राज्य मंत्रिमडळातील सर्व मंत्र्याची भेट घेऊन पत्रकार संरक्षण कायदा त्वरित लागू करण्याबाबत निवेदन देणार आहे अशी माहिती विनोद पत्रे ,अनिल चौधरी , नंदकिशोर धोत्रे , विजय सूर्यवंशी , आनंद सागर , अमोल मराठे , अमिता चौहान यांनी दिली .

Share this:

Post a Comment

सूचना

विदर्भ24न्यूज़ पोर्टल को बेहतर बनाने में सहायता करें और किसी खबर या अंश मे कोई गलती हो या सूचना / तथ्य में कोई कमी हो तो हमसे संपर्क करे - 9421719953

 
Copyright © 2014 Vidarbha Latest News विदर्भ24न्यूज Amravati Letest News. Template Designed by Vidarbha24news - या इंटरनेट न्यूज चॅनेल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही.