प्रविण गोंगले / चंद्रपूर
चंद्रपूर रेल्वे स्थानकावर दाखल झालेल्या "डेक्कन ओडिसी" या फाइव्ह स्टार रेल्वे गाडी बाबत एक नवीन वाद समोर झालाय. चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी असल्यामुळे या गाडीला चंद्रपूर जिल्ह्यात येण्याची परवानगी दिलीच कशी असा मुद्दा उपस्थित करत चंद्रपूर जिल्हा बार असोसिएशन ने रामनगर पोलिस स्टेशन मध्ये या बाबत तक्रार दाखल केली आहे. palace on wheels अशी ओळख असलेली "डेक्कन ओडिसी" ही सर्व सुविधांनी युक्त असलेली रेल्वे ही महाराष्ट्र पर्यटन विभागाची खास ट्रेन आहे. विदेशी पर्यटकांना डोळ्यासमोर ठेवून तयार करण्यात आलेल्या या ट्रेन मध्ये दारू शौकिनांसाठी स्वतंत्र बार ची देखील व्यवस्था आहे. आज पहाटे ८१ विदेशी पर्यटकांना घेवून ही गाडी ताडोबा दर्शनासाठी चंद्रपूर रेल्वे स्टेशन वर दाखल झाली मात्र यात असलेल्या बार वर चंद्रपूर जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष दिपक जयस्वाल आणि राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष नितीन भटारकर यांनी आक्षेप घेतला आहे.
या बाबत असोसिएशन ने दिलेली तक्रार रामनगर पोलिस ने नोंदविली असली तरी अजून कुठलीही कारवाई करण्यात आलेली नाही.
Post a Comment