जागर टीव्ही अॅन्ड फिल्म नेटवर्क प्रा.ली निर्मीत
संकेत साक्षी फिल्म प्रस्तुत अस्सल मराठमोळा बोलीभाषेचा बाज असणारा व मनात घर करुन बसणारा शिरपा हा चित्रपट लवकरच रसिकांच्या भेटीला येत आहे. जागर ग्रुप ऑफ मीडीयाचे प्रशांत मानकर,सुनील सिरसाठ हे चित्रपटाचे निर्माते असुन कार्यकारी निर्माते सुभाष गवई,सहनिर्माते गोपाल भट, सुदेषना नावकार, किरण चव्हाण आहेत. सुप्रसीध्द दिग्दर्शक नितीन कांबळे यांच्या दिग्दर्शनात साकार झालेल्या या चित्रपटामध्ये सुप्रसीध्द खलनायक-अभिनेते ज्यांनी नटरंग सारख्या गाजलेल्या चित्रपटासह अनेक चित्रपटांमधुन अभिनय केलेला आहे असे मिलींद शिंदे तसेच अभिनेते सुनील प्रल्हाद,आणि सिंघम रिटर्न या हिंदी चित्रपटात आपल्या अभिनयाने रसीकांचे मने जिंकणार्या फॅंड्री - सैराट फेम छाया कदम, नितीन कांबळे, सुप्रसीध्द जेष्ठ अभीनेत्री प्रेमा किरण ज्यांनी मराठी रसीकांच्या मनावर नेहमीच अधीराज्य गाजवले, त्याजोडिला अभिनेत्री नम्रता जाधव,सुदेश्णा नावकार,रेणु महामुने,जेष्ठ अभिनेते रवींद्र बेर्डे,माजी आमदार व अभिनेते तुकारामजी बिरकड,गोपालजी भट,बी.गोपनारायण,यांच्यासह अनेक दिग्गज कलाकारांच्या अभिनयाने साकार झालेल्या या चित्रपटाचे बहुतेक चित्रीकरण विदर्भातिल अनेक भागात झालेले असुन वैदर्भीय कलाकारांच्या कलागुणांचा आविष्कार या चित्रपटातुन लवकरच आपल्याला बघायला मिळणार आहे. सुप्रसीध्द अभिनेते मिलींद शिंदे यांनी पहील्यांदाच या मराठी चित्रपटात पार्श्वगायन केलेले असुन त्या गीताचे गितलेखन सुप्रसीध्द कवी लेखक किशोर बळी केले असून संगीत त्रुप्ति चव्हाण यांनी केलय,चित्रपटातील इतर तीन गाण्यांचे गीत लेखन लहु ठाकरे यांनी केलेले असून संगित दिग्दर्शनाचि मोठि धुरा भास्कर दाबेराव यांनी सांभाळली आहे . चित्रपटात सुप्रसिद्ध गायक आनंद शिंदे,उर्मिला धनगर,स्वप्नील बांदोडकर यासारख्या प्रसिद्ध गायकांनी गीत गायन केले आहे,याव्यतिरिक्त अजून एक सुरेख गाणं अतुल राहुल नावाच्या नव्या उमद्या जोडगोळीने संगीतबद्ध केला आहे . चित्रपटाचे न्रुत्य दिग्दर्शन संतोष भांगरे यांनी केलय ,कला दिग्दर्शन धनराज तावडे यांचे आहे. कथा बी गोपनारायण यांची असुन चित्रपटातील पटकथा व संवाद नितीन कांबळे यांचे आहेत, त्रुप्ति चव्हाण यांची या चित्रपटाला उत्कूष्ट पार्श्वसंगीताची साथ लाभली आहे. अनेक आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टीवल मध्ये गेलेला हा चित्रपट वैदर्भीय मातीचा सुंगध सातासमुद्रापार घेवुन जाणारा आहे. अनेक दिग्गज तथा सुप्रसीध्द कलाकारांना घेवुन तयार झालेला हा चित्रपट रसीकांच्या ह्दयावर अधीराज्य गाजवेल यात शंकाच नाही. शिरपा हा चित्रपट लवकरच आपल्या जवळच्या चित्रपटगूहात आपल्या बघता येणार आहे. चित्रपटाच्या यशस्विततेसाठी जागर ग्रूप ऑफ मीडियातिल सर्वांचे अनमोल सहकार्य लाभले. अशी माहीती एका प्रसीध्दीपत्रकाव्दारे जागर ग्रूप ऑफ़ मीडियाचे संचालक चित्रपटाचे व्यवस्थापक विशालराजे बोरे यांनी दिली आहे."
Friday, May 6, 2016
जागर टीव्ही अॅन्ड फिल्म नेटवर्क प्रा.ली निर्मीत काळजाचा ठाव घेणारा चित्रपट 'शिरपा'लवकरच प्रेक्षकांचा भेटीला...
Posted by vidarbha on 12:41:00 PM in http://vidarbha24news.com/ | Comments : 0
Subscribe to:
Post Comments
(
Atom
)
Post a Comment