कर्जत/जयेश जाधव
" आरोग्यम धनसंपदा '' आस म्हटल जात.आजकाल सामान्य मानुस फिटनेस बाबत आधिक जागरूक झालाय.रोजच्या धकाधकीच्या जिवनात स्वःताला आनेक आजरापासुन दुर ठेवण्यासाठी सामान्य नागरिक फिटनेस कडे लक्ष देतात.तर अनेकांना आपला लठ्ठ पणा कमी करायचा आसतो.यासाठी आनेक जन जिम सुरू करतात.तर काहीजण चालणे,धावणे व एक्ससाईज करतात तर कही योगा करतात.माञ नक्की फिटनेस म्हणजे काय ? हेच मुलात अनेकांना माहीत नसत.तसेच त्या संबधी योग्य मार्गदर्शक नसल्याने त्याचा फरक शरीरावर जानवत नाही.त्यासाठी योग्य आशा मार्गदर्शकाची गरज सर्वानाच भासते यांच क्षेञाशी संबधित पदवी प्रथम श्रेनीतुन उत्तीर्ण होवून कर्जतच्या तेजस दाभणे या तरूनाने यश संपादण केले आहे.त्यामुळे भविष्यात कर्जतकरांच्या सेवेसाठी या तरूनाचा हातभार लागणार आहे.
मुंबई सांताक्रुज येथील '' के इलेवन " फिटनेस अॅकडमीतुन शासन मान्यता आसलेल्या " फिटनेस ट्रेनर " कोर्सच्या पि.टी.एम 208 या तुकडीतुन प्रथम श्रेणी उत्तीर्ण होवून तेजसने यश प्राप्त केले आहे.त्यामुळे कोणत्याही व्यक्तीला एकाच प्रकारचा व्यायाम सर्व फायदे मिलुन देवू शकत नाही.त्यासाठी फिटनेस म्हणजे काय ? हे समजवून घ्यायला हवे.फिटनेस म्हणजे शरीराची रोजच्या जिवनातील आव्हानात्मक कामे कमीतकमी ञास सहण करूण करण्याची क्षमता.त्यासाठी शरीराची ताकद वाढवणे व लवचिता वाढवणे.तसेच फॅट लाॅस म्हणजे वेट लाॅस नव्हे.
फॅट लाॅस म्हणजे फक्त चरबी कमी करणे व मसल वाढवणे. डायटिंग करणे म्हणजे उपाशी राहाणे नसुन शरीराला आवश्यक आसा सकस आहार घेणे होय.फॅट लाॅस साठी फक्त कार्डिओ आवश्यक नसुन जास्तीत जास्त वेट ट्रेनिंग देखील आवश्यक आहे.व्यायाम म्हणजे वेट ट्रेनिंग हि फक्त पुरूषानाच नाही तर स्ञियाना देखिल फिटनेस साठी आवश्यक आहे.असे त्यानी पत्रकाराजवळ बोलताना सांगीतले.
Post a Comment