मुंबई -
१२ मेच्या सकाळी ६.३० वाजता कडक पोलीस बंदोबस्तात भूमाता बिग्रेडच्या तृप्ती देसाई यांनी हाजी अली दर्ग्यात महिलांसाठी असलेल्या मर्यादेपर्यंत जात प्रवेश केला.
१२ मेच्या सकाळी ६.३० वाजता कडक पोलीस बंदोबस्तात भूमाता बिग्रेडच्या तृप्ती देसाई यांनी हाजी अली दर्ग्यात महिलांसाठी असलेल्या मर्यादेपर्यंत जात प्रवेश केला.
दर्ग्यातील मजार-ए-शरीफमध्ये महिलांना प्रवेश करण्यास अनुमती नाही;
मात्र पुरुषांच्या बरोबरीने महिलांनाही त्या ठिकाणी प्रवेश देण्यात यावा,
अशी मागणी तृप्ती देसाई यांनी केली आहे. पुढील १५ दिवसांत महिलांना मजार
प्रवेश देण्याचे आवाहन तृप्ती देसाई यांनी दर्ग्याच्या विश्वस्तांना केले
आहे. तसे न झाल्यास आम्हाला आंदोलन आणखी तीव्र करावे लागेल, असेही त्या
पुढे म्हणाल्या. देसाई यांच्यासमवेत त्यांच्या महिला कार्यकर्त्यासुद्धा
होत्या. दर्ग्यात जाऊन दर्शन घेतल्यानंतर देसाई यांनी हाजी अली पोलीस ठाण्यात
उपस्थिती लावली. दर्ग्यात जाऊन दर्शन घेणार असल्याची माहिती देसाई यांनी
पोलिसांशिवाय इतर कोणालाही दिली नव्हती. पोलिसांनी देसाई यांना सहकार्य करत
कडक बंदोबस्तात त्यांना मजारपर्यंत प्रवेश मिळवून दिला. याआधीसुद्धा
तृप्ती देसाई यांनी २८ एप्रिल या दिवशी हाजी अली दर्ग्यात प्रवेशाचा
प्रयत्न केला होता; मात्र झालेल्या विरोधामुळे देसाई यांना त्या दिवशी
दर्ग्याच्या प्रवेशद्वारावरूनच माघारी परतावे लागले होते.
Post a Comment