उज्जैन -
वैश्विक सिंहस्थाच्या ९ मे या दिवशी असणार्या द्वितीय मोठ्या स्नानासाठी आखाड्यांचा स्नानक्रम आणि मार्ग निश्चित करण्यात आले आहेत. उज्जैनमध्ये नुकत्याच झालेल्या अखिल भारतीय आखाडा परिषदेचे अध्यक्ष महंत श्री नरेंद्रगिरि महाराज यांच्या अध्यक्षतेखाली एक बैठक पार पडली. दुसर्या अमृत योगी स्नानासाठी ज्योतिष तथा द्वारका पीठाचे शंकराचार्य स्वामी स्वरूपानंद सरस्वती, तसेच पुरी पिठाधीश्वर शंकराचार्य स्वामी निश्चलानंद सरस्वती महाराज सहभागी होण्याची शक्यता आहे. या स्नानासाठी प्रशासनाने पूर्ण सिद्धता केली असून आखाड्यांच्या मागे-पुढे पोलीस आणि निमलष्करी दलाचे सैनिक तैनात असणार आहेत. श्री नरेंद्रगिरि महाराजांनी भाविक आणि प्रशासन यांना आवाहन केले आहे की, सिंहस्थामध्ये झालेले वादळ आणि मुसळधार पाऊस यांमुळे भाविकांच्या मृत्यूच्या घटना लक्षात घेऊन स्नानासाठी निघणार्या आखाड्यांनी बॅण्डबाजा अल्प प्रमाणात वापरून अल्प वेळेत स्नान करून मूळस्थानी परतावे. प्रत्येक आखाड्याच्या सुरक्षेसाठी प्रत्येकी १०० सैनिक तैनात करावेत. आखाड्यांच्या परंपरेनुसार स्नान होईल. उन्हाळ्यामुळे लोकांना त्रास होऊ नये; म्हणून पाण्याची सोय करण्यात यावी. साधू-संतांचे स्नान झाल्यानंतर दुपारी २ पासून भाविकांना स्नानाची अनुमती दिली जाणार आहे.
सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने स्नानासाठी येणारे आखाडे आणि साधूसंत यांचे स्वागत करणार आहेत.

Post a Comment