मुंबई - -
डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची हत्या झाल्यावर सनातन संस्थेवर बंदी आणण्याचा प्रस्ताव मी मुख्यमंत्री असतांना केंद्रशासनाकडे पाठवला होता; मात्र केंद्रशासनाने संस्थेवर बंदी घातली नाही, तसेच बंदी घालण्यास नकारही दिला नाही, अशी स्वीकृती महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी टाइम्स ऑफ इंडिया या वृत्तपत्रास मुलाखत देतांना दिली आहे.
श्री पृथ्वीराज चव्हाण म्हणाले,
१. मी मुख्यमंत्री असतांना डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची हत्या झाली. मी गुप्तहेर खात्याकडून माहिती घेतली असता त्यांनी सनातन संस्थेवर संशय व्यक्त केला. २. या प्रकरणी सनातनच्या एका साधकास अटकही करण्यात आली; मात्र नंतरचे अन्वेषण संथ गतीने चालू आहे. आता सनातनवर बंदी आणण्याच्या विषयावर युती शासनाने त्यांची भूमिका स्पष्ट करावी. गोहत्या बंदीविषयी बोलतांना श्री. चव्हाण म्हणाले, मी गोहत्या बंदीच्या विरोधात नाही; मात्र काय खावे याची निवड करण्याचा अधिकार लोकांना आहे. आपल्या धार्मिक श्रद्धा इतर धर्मियांवर लादण्याची सक्ती धर्मनिरपेक्षतेच्या विरुद्ध आहे. भाकड गुरांच्या पोषणासाठी शासनाने काहीच व्यवस्था न केल्याने त्यांचे काय करावे, हा प्रश्न शेतकर्यांना भेडसावत आहे.

Post a Comment