उज्जैन -
सिंहस्थपर्वासाठी रेल्वेने येथे पोहोचलेले पुरीच्या गोवर्धनपीठाचे शंकराचार्य सन्माननीय स्वामी निश्चलानंद सरस्वती यांना अवमानाला सामोरे जावे लागले. प्रथम ते ज्या रेल्वेगाडीने येत होते ती दोन घंटे उशिरा पोहोचली. उज्जैन येथे त्यांच्या स्वागतासाठी आणि त्यांना सिंहस्थक्षेत्री नेण्यासाठी मध्यप्रदेश प्रशासनाकडून कोणीही उपस्थित नव्हते. तसेच त्यांच्यासाठी व्हीलचेअरची व्यवस्था करण्यात आली नव्हती. त्यामुळे शंकराचार्यांना काही वेळ फलाटावरील लोखंडी दांड्यावर बसावे लागले. या अवमानानंतरही शंकराचार्य कोणावरही अप्रसन्न झाले नाहीत
मात्र त्यांच्या भक्तांकडून अप्रसन्नता व्यक्त करण्यात आली. शंकराचार्याचे अनुयायी सुधीर चतुर्वेदी, शिवशंकर शर्मा आदींनी सिंहस्थाचे प्रभारी मंत्री भूपेंद्रसिंह यांना शंकराचार्यांच्या आगमनची माहिती आधीच दिली होती. यानंतर दुपारी ३ वाजता शंकराचार्य हरसिद्धी मंदिरासमोरील त्यांच्या रूद्रसागर शिबिरासाठी मार्गस्थ झाले. ते २२ मेपर्यंत सिंहस्थ क्षेत्री रहाणार आहेत. या कालावधीत ते सकाळी ११ ते दुपारी १ आणि सायंकाळी ६ ते रात्री ८ पर्यंत प्रतिदिन भक्तांना दर्शन देणार आहेत.

Post a Comment